ओले आले चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला दहा वर्ष पूर्ण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![ओले आले चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला दहा वर्ष पूर्ण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या marathi movie telly masala marathi serial latest update ole aale marathi movie release date to julun yeti reshimgathi marathi serial completes 10 years ओले आले चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला दहा वर्ष पूर्ण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/10/b2cf20d2a873fdb66af8d0856ab46fe41699618117023259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Short Film: तार ते केवडा; एकही रूपया खर्च न करता पाहा 'या' मराठी शॉर्ट फिल्म्स
Marathi Short Film: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) बघायला अनेकांना आवडतात. तसेच अनेक शॉर्ट फिल्म देखील विविध प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केल्या जातात. जास्त वेळ न घालवता, चांगला कंटेन्ट बघायचा असेल, तर तुम्ही या शॉर्ट फिल्म्स पाहू शकतात. अनेक वेळा शॉर्ट फिल्म पाहिण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platforms) सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. पण काही शॉर्ट फिल्म या तुम्ही एकही रूपया खर्च न करता पाहू शकता. जाणून घेऊयात युट्यूबवरील मराठी शॉर्ट फिल्मबाबत....
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Julun Yeti Reshimgathi: 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला दहा वर्ष पूर्ण; प्रजक्ता आणि ललित म्हणतात, "दुसरा भाग.."
Julun Yeti Reshimgathi: छोट्या पडद्यावरील मालिका अनेक प्रेक्षक दररोज आवडीनं बघतात. मराठी मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. 'जुळून येती रेशीमगाठी' (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्तानं अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ole Aale: 'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!'; नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांचा ओले आले चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Ole Aale: आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole Aale) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Raj Thackeray: दिवाळीनिमित्त राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून अमृता खानविलकरला खास भेट; अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ
Raj Thackeray: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) नुकतीच दिवाळीनिमित्त एक खास भेटवस्तू मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Letter) यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अमृता खानविलकरला खास गिफ्ट देण्यात आलं आहे. या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमृतानं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Priya Bapat: "प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला...."; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष
मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्रिया बापटनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.प्रियानं तिच्या पोस्टच्या माध्यमातून प्लास्टिकच्या आकाश कंदिलच्या विक्रीबाबत संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)