एक्स्प्लोर

Ole Aale: 'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!'; नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांचा ओले आले चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) यांचा 'ओले आले' (Ole Aale) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Ole Aale: आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत.  कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole Aale) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. 

कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' चित्रपटाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली 'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!' ही ओळ आणखी कुतूहल निर्माण करणारी आहे. हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय बरं असेल? असे बरेच प्रश्न उत्सुकता निर्माण करत आहेत.
 
रश्मिन मजीठिया निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. “मराठी सिनेरसिकांची आवड निवड लक्षात घेऊन आम्ही 'ओले आले' हा चित्रपट बनवला आहे. यात जी प्रवासाची धम्माल गोष्ट आहे, ती प्रत्येकाला नक्कीच जवळची वाटेल. ही सहल प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी असेल”, असा विश्वास कोकोनट मोशन पिक्चर्सचे संस्थापक रश्मिन मजीठिया यांनी व्यक्त केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Coconut Motion Pictures (@coconutmotionpictures)

कधी रिलीज होणार चित्रपट?

'ओले आले' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात 5 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'ओले आले' या चित्रपटाच्या आधी सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव  यांचा झिम्मा-2 हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. 'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी,  रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत,क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर आणि शिवानी सुर्वे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Short Film: तार ते केवडा; एकही रूपया खर्च न करता पाहा 'या' मराठी शॉर्ट फिल्म्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Embed widget