(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala: 'बाईपण भारी देवा' लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा ते विविध विषयांवर भरभरुन बोलली मानसी नाईक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Taali Review : शिवीपासून टाळीपर्यंतची कहाणी म्हणजे 'ताली'
Sushmita Sen Taali Web Series Review : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनित 'ताली'चा (Taali) ट्रेलर आऊट झाल्यापासून या सीरिजबद्दलची उत्सुकता वाढली होती. गौरी सावंत यांच्या आई होण्याच्या प्रवासाची गोष्ट म्हणजे 'ताली' ही सीरिज (Taali Web Series) आहे. तृतीयपंथी असणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) यांचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी केलेली मात अशा अनेक गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहे. गणेश ते गौरीपर्यंतचा प्रवास पाहताना खरचं अंगावर शहारे येतात.
सविस्तर रिव्ह्यू वाचण्यासाठी क्लिक करा
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा; केदार शिंदे म्हणाले,"सिनेमाचं यश मराठी सिनेसृष्टीसाठी सुखावणारं आहे"
Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आज या सिनेमाला सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनंतरही या चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ कायम आहे. मोठा वीकेंडचा फायदा या सिनेमालाही झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Taali: सासूबाई आणि पत्नीकडून सुव्रतचं कौतुक; 'ताली' वेब सीरिज पाहिल्यानंतर सखी आणि शुभांगी गोखलेंनी शेअर केली पोस्ट
Taali: 'ताली' (Taali) ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) ताली या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. सुव्रतची पत्नी सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि त्याच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ताली वेब सीरिजमधील सुव्रतच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khupte Tithe Gupte : "मी राहुल गांधींची भूमिका केली तर..."; सुबोध भावेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Subodh Bhave In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हजेरी लावणार आहे. सुबोध भावेने आजवर लोकमान्य टिळक, बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा वेगवेगळ्या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सुबोधला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बायोपिकबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Manasi Naik: चंद्रमुखी चित्रपट, रिल्स आणि किसिंग सिन; विविध विषयांवर भरभरुन बोलली मानसी नाईक
Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मानसी ही सोशल मीडियावर विविध रिल्स आणि फोटो शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच मानसीनं गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मानसीनं विविध विषयांवर चर्चा केली.