(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत
Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवार
रोहित पवार आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहोत असे नाही. आम्ही काही झाले तरी 124 ते 130 जागा जिंकू असा आमचा अंदाज होता. परंतु इतक्या सहजपणे महायुतीला कौल जाईल हे कोणी स्वीकारायला तयार नाही. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला 74 लाख मतदान वाढले. Evm मध्ये गडबड असण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावित. आमच्या तज्ञांच्या उपस्थितीत चिकित्सा व्हावी. निवडणूक आयोगाने आमची शंका दूर करावी. मशिन्स गुजरातमधून आणल्या गेल्या होत्या. Evm मशीन मध्ये आमची लोकशाही अडकलीय. आम्ही रडीचा डाव खेळत नाही. हिंमत असेल तर आम्ही सांगू ती मशिन्स निवडणूक आयोगाने समोर आणावीत. आम्हालाही काही लोक भेटले होते जे मतदान वाढवून देतो म्हणाले होते. पण आमचा लोकशाही वर विश्वास आहे. तेव्हा ते लोक त्यांच्याकडे गेले नसतील कशावरून ? पोस्टल मतदान आणि evm मधील उमेदवारांना मिळालेल्या मतदानात मोठी तफावत आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांची माझ्या मतदार संघात व्हायला पाहिजे होती. माझे मताधिक्य वाढले असते. अजित पवारांनी सभा घेतली नाही अन्यथा मी पडलो असतो असा अर्थ काढता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याबाबता शिवसेनेची भूमिका कदाचित मुंबई महापालिका संदर्भात असावी.