Telly Masala : 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे झाल्या भावूक ते किरण मानेंनी 'जवान' चित्रपटाबद्दल शेअर केली खास पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सुप्रिया सुळे झाल्या भावूक; प्रोमोनं वेधलं लक्ष
Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) करतो. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या भावूक झालेल्या दिसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tejashree Pradhan : शाळेत असताना बाप्पासोबत लावलेली सेटिंग आजही कायम; तेजश्री प्रधान रमली बाप्पाच्या आठवणीत
Tejashree Pradhan On Kalavantancha Ganesh : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashree Pradhan) बाप्पासोबतचं तिचं नातं शेअर केलं आहे. गपणती बाप्पा बुद्धीची देवता असून आजही मी त्याच्याकडे बुद्धी मागते असं अभिनेत्री म्हणाली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीची चाहत्याने केली छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना; अभिनेता म्हणाला,"माझ्यात त्यांच्या..."
Gashmeer Mahajani Compare Chhatrapati Sambhaji Maharaj : रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता इन्स्टाग्रामवर 'Ask Gash' या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दरम्यान एका चाहत्याने छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याशी अभिनेत्याची तुलना केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: 'प्रेक्षक वेडे नसतात. पितळ,सोनं, काच आणि हिरा यातला फरक कळतो त्यांना...'; किरण मानेंची शहरुखच्या 'जवान'बद्दल खास पोस्ट
Kiran Mane:अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक जवान चित्रपटामध्ये शाहरुखची एन्ट्री होताच टाळ्या, शिट्ट्या वाजवत आहेत. या चित्रपटाचं अनेकजण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील नुकतीच शाहरुखच्या जवान या चित्रपटाबद्दल नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mahesh Tilekar: महेश टिळेकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, 'काम झाल्यावर सरड्याप्रमाणे रंग बदलले'
Mahesh Tilekar: प्रसिद्ध चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतीच महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. तसेच महेश टिळेकर यांनी काही कलाकारांबाबत देखील या पोस्टमध्ये लिहिलं आहे.