Telly Masala : प्रसाद ओकनं शेअर केली खास पोस्ट ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या भन्नाट डान्सनं वेधलं लक्ष; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Prasad Oak: "भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल!"; प्रसाद ओकनं शेअर केली खास पोस्ट
Prasad Oak: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रसादचा गेल्या वर्षी धर्मवीर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. प्रसाद हा सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे तो परीक्षण करतो. नुकतीच प्रसादनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Celebrity: कुणाचं आहे कॅफे तर कुणाचं आहे रेस्टॉरंट; 'या' मराठी कलाकारांची हॉटेल व्यवसायात भरारी
Marathi Celebrity: अनेक मराठी सेलिब्रिटी हे सध्या अभिनयक्षेत्रात करत करण्यासोबतच स्वत:चा व्यवसाय देखील करत आहेत. काही सेलिब्रिटींनी हॉटेल व्यवसायात एन्ट्री केली. कोण कोणते सेलिब्रिटी हे हॉटेल व्यवसायात काम करत आहेत? याबाबत माहिती घेऊयात...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gaurav More: "हो गया है तुझको तो प्यार सजना"; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातील कलाकार हे त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आहे. "गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा" या गौरवच्या जबरदस्त डायलॉगनं तर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. गौरव हा सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. नुकताच गौरवनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mukta Barve: "पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना..."; मुक्ताच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Mukta Barve: अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. मुक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. मुक्ता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असते. सध्या मुक्ता ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मुक्तानं एका प्रसिद्ध हॉटेलच्या नावाचा उल्लेख करुन एक पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Naal 2 Teaser: नागराज मंजुळेंनी शेअर केला 'नाळ-2' चा टीझर; माय-लेकाची गोष्ट घेऊन पुन्हा रुपेरी पडदा गाजवणार
Naal 2 Teaser: नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'नाळ' (Naal) हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. नाळ चित्रपटाच्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज घेऊन येत आहेत 'नाळ भाग 2'. सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाची प्रेक्षकांशी 'नाळ' जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकवले. चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, गाणी या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'आई मला खेळायला जायचंय' या गाण्याने तर प्रेक्षकांवर जादूच केली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा 'चैत्या'च्या त्या निरागस भावविश्वात नेण्यासाठी सुधाकर रेड्डी यक्कंटी सज्ज झाले आहेत. 'नाळ भाग 2' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.