एक्स्प्लोर

Prasad Oak: "भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल!"; प्रसाद ओकनं शेअर केली खास पोस्ट

नुकतीच प्रसाद ओकनं (Prasad Oak) एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Prasad Oak: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता   प्रसाद ओक (Prasad Oak)   हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रसादचा गेल्या वर्षी धर्मवीर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. प्रसाद हा सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे तो परीक्षण करतो. नुकतीच प्रसादनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

प्रसाद ओकची पोस्ट

प्रसादनं विठ्ठलाच्या मूर्तीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं,"आज अचानक पॅकअपनंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप vanity van मधे आला आणि म्हणाला… “ दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत. त्यांना 5 मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव, त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे 2/3 मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला… दुसऱ्यानी गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथ नी. ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली  आणि सगळे जाऊ लागले. मी म्हणालो “ एवढ्याच साठी आला होतात ?” त्यावर ते म्हणाले “ हो दादा, वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले. मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं,या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे.पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे. अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्ती कडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर मधले आमच्यासंगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले-

संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसादनं शेअर केलेल्या पोस्टला जितेंद्र जोशीनं कमेंट केली, 'माऊली आणखी जवळ आली' तर मंजिरी ओकनं कमेंट केली, 'जय हरी विठ्ठल'

 इतर महत्वाच्या बातम्या:

Prasad Oak: प्रसाद ओकचा 'जिलबी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget