एक्स्प्लोर

महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर जुंपली

निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर जुंपली आहे. टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती. त्यावर अभिनेता आरोह वेलणकरने टिळेकर यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आरोहच्या टीकेला महेश टिळेकर यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर चांगला सामना रंगला आहे. महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यावर लिहिलेल्या पोस्टवरुन संतापलेल्या आरोह वेलणकरने टिळेकर यांच्यावर निशाणा साधला. "स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा? तुमची टीका वाचून लाज वाटली. तसंच तुमच्या मराठी तारका या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू," असं आरोह वेलणकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. त्यावर महेश टिळेकर यांनीही उत्तर दिलं आहे. "जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन," असं महेश टिळेकर म्हणाले.

वाद सुरु कशावरुन झाला? खरंतर अमृता फडणवीस यांचं 'तिला जगू द्या' हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. यावर टीका करणारी पोस्ट महेश टिळेकर यांनी फेसबुकवर लिहिली. 'हिला नको गाऊ द्या' अस म्हणत महेश टिळेकर यांनी ही पोस्ट लिहिली होती. या पोस्टखाली अनेक जण समर्थनार्थ आणि विरोधात कमेंट्स करत होते.

हिला नको गाऊ द्या चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी... Posted by Mahesh Tilekar on Monday, 16 November 2020

मात्र अमृता फडणवीस यांच्यावरील टीकेमुळे संतापलेल्या अभिनेता आरोह वेलणकरने महेशी टिळेकर यांना उद्देशून पोस्ट लिहिली आणि टीका केली.

आरोह वेलणकरने काय म्हणाला? महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!? ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा... राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!

महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही... Posted by Aroh Welankar on Friday, 20 November 2020

आरोहला उत्तर देणारी महेश टिळेकर यांची पोस्ट Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना?का तिथे समाजसेवा करायला गेला होतास?ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास?ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का?तेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे?कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का?जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे 👍म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयावा मधून बाहेर येत आहे रे पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल👍#ArohVelankar महेश टिळेकर

Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश...

Posted by Mahesh Tilekar on Friday, 20 November 2020

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget