(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nikhil Bane : जुन्या जागेत एक आत्मा राहतो... चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराबद्दल काय म्हणाला 'हास्यजत्रा फेम' निखिल बने....
Nikhil Bane : खरी माणसं चाळीत भेटत असल्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने चाळीतील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Nikhil Bane : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने (Nikhil Bane) सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. निखिलने चाळीतील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने निखिलला ओळख मिळवून दिली आहे. निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून आजही तो चाळीत राहतो. निखिलने नुकताच चाळीतील घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत निखिलने चाळीतील घराच्या आठवणी शेअर केल्या आहेत. निखिल म्हणाला, चाळ आणि माझं नातं जगावेगळं आहे. खरी माणसं चाळीत भेटतात. चाळीने अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. चाळीने माझ्या नकळत माझ्यावर बरेच संस्कार केले आहेत. परिस्तिथी नुसार आपण कसं वागल पाहिजे हेदेखील शिकवलं. खरेपणा आणि माणसं ओळखायला चालीने शिकवलं आहे.
दहा बाय दहा ची सर 350sq फूट ला नाही
चाळ न सोडण्याबाबात निखिल बने म्हणाला, माझा जन्मच चाळीत झाल्याने चाळी सोबत एक वेगळीच नाळ जोडली गेली आहे. मला असं वाटतं चाळीत खरं जगणं आहे. इथे माणसं खऱ्या अर्थाने जगतात जे असेल जसं असेल त्यात जगण्यातला आनंद शोधत जगतात. मला लहापणापासूनच माणसांमध्ये राहायची सवय आहे. माझ्या आजूबाजूला माणसं नसली की मला करमत नाही. चाळीत सगळे सण एकत्र येऊन साजरे केले जातात त्यात एक वेगळी गंमत आहे. चाळीची खरी किंमत कोरोनाच्या काळात आम्हाला कळाली. दहा बाय दहा ची सर 350sq फूट ला नाही. म्हणून चाळ सोडावीशी नाही वाटत.
View this post on Instagram
निखिल पुढे म्हणाला,"माझ्या जडणघडणीत चाळीचा खूप मोठा वाटा आहे. कारण माझी चाळ मला आपण कितीही मोठे झालो तरी कायम जमिनीवर कसं राहायला हवं हे शिकवते. माझ्यात जी काही ऊर्जा आहे ती चाळीमुळेच आलेली आहे. चाळीतच धडपडलो, ओरडा खाल्ला, मार खाल्ला, सगळ्यांना त्रासही दिला आणि त्यातूनच शिकत शिकत मोठा झालो. आजपर्यंत माझ्या चाळीतल्या माणसांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. खरी माणसं चाळीत भेटतात."
संबंधित बातम्या