Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'आई कुठे काय करते'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन आणि श्रिया पिळगावकरची हजेरी; उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते
Sachin Pilgaonkar In Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या आठवड्यात 'कोण होणार करोडपती'मध्ये शनिवारच्या विशेष भागात सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) हॉट सीटवर येणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत देशमुखांच्या घरात शिरणार चोर; कांचन आजी कसा करणार संकटाचा सामना?
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या मालिकेचा आजचा भाग खूपच उत्कंठावर्धक असणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' मध्ये ट्वीस्ट; 'या' अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री
Naagin 6: 'नागिन 6' (Naagin 6) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही प्रमुख भूमिका साकारते. 'नागिन 6' च्या सहाव्या सिझनचा प्रीमियर 12 फेब्रुवारी 2022 रोजी झाला. 'नागिन 6' मध्ये लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा मोनिकाला देणार जशास तसे उत्तर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही स्वराज ऊर्फ स्वराची आई आणि मल्हारची पहिली पत्नी वैदेहीसारखी दिसते. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही पिहूला लावणी शिकवताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anupama : अनुज आणि अनुपमाची अधुरी प्रेमकहाणी; 'अनुपमा' मालिकेचा आजच्या भागात काय पाहायला मिळणार? जाणून घ्या...
Anupama Serial Latest Update Know Details : रुपाली गांगुली आणि गौरव खन्नाची 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. दिवसेंदिवस या मालिकेतील रंजक वळणे प्रेक्षकांना थक्क करत आहेत. मालिकेत अनुपमा आणि अनुजने आता एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे माया अनुजला अनुपमापासून घटस्फोट घेण्यास सांगत आहे.