Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल तर, आता मागे नाही राहायचं! दोन दिवसात सुरू होतोय दोन कोटींचा खेळ
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Kon Honar Crorepati : ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व 29 मेपासून सुरू होत आहे.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) सांभाळत आहे. यंदा या कार्यक्रमाच्या बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्टदेखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर बसून करोडपती होण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते.
'कोण होणार करोडपती' कधीपासून होणार सुरू? (Kon Honar Crorepati Update)
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. मनासारखं जगायचं असेल तर आता मागे नाही राहायचं, असं म्हणत 'कोण होणार करोडपती' येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. या कार्यक्रमाने अनेक सामान्य व्यक्तींचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी : सचिन खेडेकर
'कोण कोणार करोडपती' या कार्यक्रमाबद्दल बोलताना सचिन खेडेकर म्हणाले,"आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं".
सचिन खेडेकर पुढे म्हणाले,"मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करुन आलेले असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर".
कोण होणार करोडपती
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? 29 मेपासून सोम. ते शनि. रात्री 9 वाजता
संबंधित बातम्या