(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मध्ये देशमुखांच्या घरी येणार नवं संकट; कांचन आजीची चूक पडणार महागात
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी नवं संकट येणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेली अरुंधती सध्या मालिकेत दिसत नसली तरीही मालिकेत ट्विस्ट येत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी कांचन आजीमुळे नवं संकट येणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागात कांचन आजीने यशसाठी स्थळ आणलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्या मुलीला पाहिल्यानंतर यशला मात्र गौरीची आठवण येते. त्यानंतर यश आजीला म्हणतो की, आजी तू चांगल्या हेतूने माझं लग्न ठरवत असशील तरी हे थांबव. मला आता लग्न करायचं नाही".
आजीनंतर त्या मुलीलाही यश सांगतो की, मला अजून गौरीचा विसर पडलेला नाही. माझ्या मनात आता दुसऱ्या कोणासाठी जागा नाही". यशच्या या बोलण्याने अभी, संजना आणि ईशा मिळून कांचन आजीला जाब विचारतात. पण आजीच्या मते, यशने गौरीला विसरावं, यासाठी त्यांचं लग्न होणं गरजेचं आहे".
View this post on Instagram
दरम्यान दुसरीकडे अनिरुद्धने आता आशुतोषच्या ऑफिसमधून काम करायला सुरुवात केली आहे. तसेच अनिरुद्धने आशुतोषची जागादेखील घेतली आहे. तर वीणादेखील अनिरुद्धला पाठिंबा देत आहे. नितीनला मात्र यासर्व गोष्टींची भीती वाटत आहे. वीणाने अनिरुद्धच्या प्रेमात पडू नये, असं त्याला वाटत आहे.
'आई कुठे काय करते'च्या प्रोमोमध्ये काय आहे?
'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की,"कांचन आजी देवळात गेल्या आहे. दरम्यान एक मुलगा त्यांना मदत करतो आणि घरी सोडायला होता. मुलाने मदत केल्याने आजी त्याच्यासाठी पाणी आणतात. दरम्यान तो मुलगा घराचे फोटो काढतो. आजींना वाटतं की तो त्यांच्या मैत्रीणीचा नाचू आहे. पण तो मुलगा केल्यानंतर आप्पा त्यांना त्या मुलाबाबत विचारतात. दरम्यान ते चोरीचा संशय व्यक्त करतात. आता या चारोने मदतीचं नाटक करत चोरी केली आहे का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात कळेल.
संबंधित बातम्या