Maharashtra Television News : 'ठरलं तर मग' ते 'आई कुठे काय करते'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमँटिक वळणावर; अद्वैत आणि नेत्राच्या प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो व्हायरल
Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका रोमँटिक वळणावर आली आहे. अद्वैत आणि नेत्राच्या प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Anupama: 'अनुपमा' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; डिंपीवर भडकली अनुपमा, 'हे' आहे कारण
Anupama: 'अनुपमा' (Anupama) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये प्रेक्षकांना सासू-सुनेची भांडणं पाहायला मिळतात. या मालिकेच्या मंगळवारच्या (20 जून) एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. शोमध्ये अनुपमा ही तिची सून डिंपीवर चिडते. अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल की अनुपमा ही डिंपीला घर सोडायला सांगते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या एका चुकीची आशुतोष वाट पाहतोय; 'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवा ट्विस्ट
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, यश हा त्याच्या आजोबांसाठी भजी घेऊ येतो. तितक्यात अरुंधतीचा फोन यशला येतो. अरुंधती ही यश आणि अप्पांना तिच्या घरी वडे खायला बोलवते. त्यानंतर प्रोमोमध्ये दिसते की अनिरुद्ध हा वीणा आणि त्याच्या बिझनेसबाबत अशुतोषबरोबर चर्चा करतो.
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत नवा ट्विस्ट; अर्जुन-सायली राहिले बाजूला अन् साक्षीने चैतन्यला केलं प्रपोज
Tharala Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याने टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. सध्या या मालिकेतील अर्जुन-सायलीची नव्हे तर एका वेगळ्याच जोडीची चर्चा आहे. मालिकेच्या आगामी भागात साक्षी चैतन्यला प्रपोज करताना दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
FIR on Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; लवकरच होणार अटक
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Producer Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते आणि ऑपरेशनल हेड यांच्या विरोधात मध्यरात्री पवई पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.