Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या एका चुकीची आशुतोष वाट पाहतोय; 'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवा ट्विस्ट
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या प्रोमोमध्ये अशुतोष, वीणा आणि अनिरुद्ध हे बिझनेसबाबत बोलताना दिसत आहेत.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, यश हा त्याच्या आजोबांसाठी भजी घेऊ येतो. तितक्यात अरुंधतीचा फोन यशला येतो. अरुंधती ही यश आणि अप्पांना तिच्या घरी वडे खायला बोलवते. त्यानंतर प्रोमोमध्ये दिसते की अनिरुद्ध हा वीणा आणि त्याच्या बिझनेसबाबत अशुतोषबरोबर चर्चा करतो.
आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसते की, अनिरुद्ध, आशुतोष आणि वीणा हे ऑफिसमध्ये काम करत असतात. अनिरुद्ध हा वीणाला विचारतो, "तू बरी आहेस ना? मला तुझी काळजी वाटते. तुला जेव्हा गरज असते, तेव्हा तुझी माणसं नसतात." वीणा म्हणते, "थँक्यु, अनिरुध्द पण हा विषय नको, आपण काम करत आहोत." अशातच अनिरुद्ध वीणाला म्हणतो, "हो, आपलं प्रेजेंटेशन आहे, हे तू अशुतोषला सांगितलं का?" यावर अशुतोष म्हणतो, "कोणतं प्रेजेंटेशन?"
अनिरुद्ध अशुतोषच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणतो, "इनव्हेस्टर्ससमोर आम्ही प्रेजेंटेशन करणार आहोत. तुम्ही आमचे इनव्हेस्टर आहेत. त्याचा आम्हाला फायदा होण्यापेक्षा नुकसान होत आहे. तुम्ही घरचे आहात. आम्हाला जी झेप घ्यायची आहे, ती एवढ्या पैशात होणार नाही." अनिरुद्धचं हे बोलणं ऐकल्यानंतर अशुतोष वीणाला आणखी पैसे देण्यास तयार होतो. पण वीणाला त्याला म्हणते, "खूप रिस्क आहे, मला तुझे पैसे नको."
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
पुढे अनिरुद्ध म्हणतो, :तुमचे पैसे घेऊन जर नुकसान झालं तर मला काही होणार नाही पण वीणाला वाईट वाटेल, म्हणून ती रिस्क घेत नाही आणि रिस्क न घेता बिझनेस कसा होणार?" त्यानंतर वीणा अशुतोषकडून पैसे घेण्यास तयार होते. वीणा आणि अनिरुध्द हे अशुतोषच्या केबिनबाहेर गेल्यानंतर अशुतोष म्हणतो, "अनिरुद्ध मोठी चुक करु शकतो आणि त्याची आपण वाट बघायची. जर अनिरुद्ध बदलला असेल, तर ते देखील आपल्याला लवकरच समजेल."
आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात तर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.
संबंधित बातम्या