(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत नवा ट्विस्ट; अर्जुन-सायली राहिले बाजूला अन् साक्षीने चैतन्यला केलं प्रपोज
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेतील साक्षी आता चैतन्यला प्रपोज करणार आहे.
Tharala Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याने टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. सध्या या मालिकेतील अर्जुन-सायलीची नव्हे तर एका वेगळ्याच जोडीची चर्चा आहे. मालिकेच्या आगामी भागात साक्षी चैतन्यला प्रपोज करताना दिसणार आहे.
'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Tharala Tar Mag Todays Episode Update)
'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन अस्मिताला टोमणे मारताना दिसणार आहे. तसेच तो सायलीसोबत गप्पादेखील मारणार आहे. तर दुसरीकडे साक्षी चैतन्यला थेट प्रपोज करताना दिसणार आहे.
सायली करणार अर्जुनला प्रपोज
'ठरलं तर मग' या मालिकेत सायली गुडघ्यावर बसून चैतन्यला प्रपोज करताना दिसणार आहे. सायलीने प्रेमाची कबूली दिल्याने चैतन्य मात्र गोंधळून जातो. साक्षीच्या दबावाखाली येत तोदेखील तिला होकार देतो. दुसरीकडे नागराज प्रियावर संशय व्यक्त करतो. तिने महागडा फोन कुठून मिळवला, ती किल्लेदारांच्या घरातील पैशांवर डोळा ठेवून आहे का? असे अनेक प्रश्न तो तिला विचारतो.
अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये असताना तू नेमका कोणता विचार करत आहे? तुला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का? असे प्रश्न अर्जुन सायलीला विचारतो. त्यावेळी सायली त्याला सांगते की, मला माझ्या आश्रमाची आठवण येत आहे. मी एकदा आश्रमाला भेट देऊन येऊ का? असं ती त्याला विचारते. पण अर्जुनने मात्र आश्रमाचा लिलाव झाल्याचं सायलीपासून लपवलं आहे. त्यामुळे सायलीच्या प्रश्नाचं उत्तर न जाता अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुनची ही गोष्ट सायलीला मात्र खटकते.
आश्रमाबद्दल सायलीला कसं सांगायचं याचा अर्जुन विचार करतो. दरम्यान चैतन्याला एक व्यक्ती फोन करुन सांगते की, आश्रमाच्या जागेवर मोजमाप सुरू झालं आहे. आता लवकरच आश्रमाच्या जागेवर नवीन बांधकामाला सुरुवात होणार आहे.
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळालं आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. आदेश, सुचित्रा आणि सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत
संबंधित बातम्या