Anupama: 'अनुपमा' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; डिंपीवर भडकली अनुपमा, 'हे' आहे कारण
'अनुपमा' (Anupama) मालिकेच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल.
Anupama: 'अनुपमा' (Anupama) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये प्रेक्षकांना सासू-सुनेची भांडणं पाहायला मिळतात. या मालिकेच्या मंगळवारच्या (20 जून) एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. शोमध्ये अनुपमा ही तिची सून डिंपीवर चिडते. अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल की अनुपमा ही डिंपीला घर सोडायला सांगते.
अनुपमा डिंपीवर का चिडली?
अनुपमाच्या (Anupama) डान्स अकादमीमध्ये एक इव्हेंट होतो, ज्यामध्ये माया गोंधळ करते. त्यानंतर गुरुमा अनुपमाला खूप ओरडतात आणि म्हणतात की, "अमेरिकेला जायला फक्त 6 दिवस उरले आहेत, त्यामुळे आता मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नाहीये." यानंतर अनुपमा खूप दुःखी आणि रागावते. यानंतर अनुपमा शाह कुटुंबाच्या घरी जाते आणि तिथला गोंधळ बघितला तेव्हा अनुपमाला आणखी राग येतो. अनुपमा ही संपूर्ण शाह कुटुंबालावर चिडते.
डिंपीसोबत भांडण झाल्यावर, बा या घर सोडण्याचा निर्णय घेतात. त्या घराबाहेर असणाऱ्या बागेत जाऊन बसतात. जेव्हा अनुपमा येते आणि बाला असे बाहेर बसलेलं पाहते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. तेव्हा बा रडत रडत अनुपमासमोर त्यांचा मुद्दा मांडतात. यानंतर अनुपमा घरी जाते आणि प्रथम बाबांना समजावून सांगते आणि त्यानंतर ती बा यांच्यासोबत भांडण केल्याबद्दल डिंपीला सुनावते.
View this post on Instagram
अनुपमा डिंपीला सांगते की, तिने तिचे संस्कार विसरू नये. हे घर बा चे आहे आणि त्यांचेच राहील. यानंतर अनुपमा डिंपीला लेक्चर देते. शेवटी अनुपमा रागाने डिंपीला सांगते की, तुला या घरात राहायचे असेल तर शांततेने राहा. नाहीतर घर सोडून जा. अनुपमा समरला घर सोडण्याचा विचार करायला सांगते. घरापासून दूर राहिलात तरी चालेल पण सर्वांवर प्रेम करा, असं अनुपमा डिंपी आणि समरला सांगते.
अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
संबंधित बातम्या
Anupama : 'या' कारणामुळे डिंपी भडकली; अनुपमा मालिकेत येणार ट्वीस्ट?