'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्री 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करतोय, मीडियासमोर दिली प्रेमाची कबुली
Shivangi Joshi Kushal Tondon Dating : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता कुशाल टंडन रिलेशनशिपमध्ये आहेत. अभिनेत्याने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
Kushal Tondon-Shivangi Joshi Dating : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता कुशाल टंडन याने अभिनेत्री शिवांगी जोशी हिच्यासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. कुशाल टंडण आणि शिवांगी जोशी कायम एकत्र दिसायचे यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. आता कुशालने या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेता कुशल टंडनने स्पष्ट केलं आहे की, तो सहकलाकार शिवांगी जोशीला डेट करत आहे.
13 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करतोय गौहर खानचा एक्स-बॉयफ्रेंड
अलिकडे शिवांगी आणि कुशाल याचे फिरताना आणि सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो समोर आले होते. दोघांनी एकत्र सुट्टी घालवतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता एका मुलाखतीदरम्यान कुशल टंडनने या नात्यावरील पडदा हडवला आहे. कुशालने सांगितलं आहे की, "तो नात्यात हळूहळू पुढे जात आहे आणि लग्नाचाही विचार करत आहे".
कुशाल टंडन आणि शिवांगी जोशी रिलेशनशिपमध्ये
अभिनेता कुशल टंडन आणि अभिनेत्री शिवांगी जोशी रिलेशलशिपमध्ये आहेत. अखेर दोन्ही स्टार्सनी त्यांचं नातं अधिकृत केलं आहे. कुशल टंडन आणि शिवांगी जोशी यांनी 'बरसातें : मौसम प्यार का'या टीव्ही मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यांच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झालं होतं. ऑफ स्क्रिनवरही कुशल आणि शिवांगीची जोडी पसंत केली जात होती. त्यानंतर आता त्यांचं प्रेमाचं नातं अधिकृत झाल्यानंतर चाहते फार खूश आहेत.
View this post on Instagram
कुशालने दिली शिवांगीवरील प्रेमाची कबुली
काही दिवसांपूर्वी या कपलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कुशल शिवांगीच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत होता. आता अलीकडेच, शिवांगीसोबतच्या त्याच्या नात्याची कबुली देताना कुशलने सांगितलं की, तो प्रेमात आहे आणि हळूहळू त्याचं नातं पुढे नेत आहे. कुशल टंडनने शिवांगी जोशीसोबतच्या त्याच्या लग्नाच्या प्लॅनिंगबाबतही सांगितलं. त्याच्या आई-वडिलांना त्याने लग्न करावे अशी इच्छा आहे, पण तो हळू हळू नातं पुढे नेत आहे.
View this post on Instagram
अभिनेता कुशल टंडनने तो प्रेमात पडल्याचं उघडपणे कबूल केलं आहे. कुशलने सांगितले की, कुशल म्हणाला, मी आता लग्न करणार नाहीय, पण मी प्रेमात नक्कीच आहे. आम्ही हे नातं खूप हळूहळू पुढे नेत आहोत. माझ्या आईला माझं लग्न झालेलं बघायचं आहे आणि जर तिला शक्य असेल तर ती आजच माझं लग्न लावेल आणि तसं बघितलं तर कधीही, काहीही होऊ शकतं. पण, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी मुलगी शोधणं आता थांबवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :