एक्स्प्लोर

भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपची पहिली यादी केव्हाही येऊ शकते, असे म्हटले होते. यानंतर ते आज सायंकाळी नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (19 ऑक्टोबर) किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपची पहिली यादी केव्हाही येऊ शकते, असे म्हटले होते. यानंतर ते आज सायंकाळी नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. फडणवीस यांनी महायुतीमधील उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचेही म्हणाले होते. सर्व मित्र पक्ष आपापल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करतील.

आमची पहिली यादी कधीही येऊ शकते

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपमधील उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम निर्णय देऊन केंद्रीय मंडळ ठरवते. त्यानंतर या पद्धतीनुसार आमची यादी जाहीर केली जाईल. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कालही आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. निम्म्याहून अधिक जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. उर्वरित जागा दोन दिवसांत क्लिअर केल्या जातील. मित्र पक्ष आपल्या सोयीनुसार मोकळ्या झालेल्या जागा जाहीर करतील, असेही आम्ही ठरवले आहे. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुतीची चर्चा सकारात्मकपणे सुरू आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्व जागांवर 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल. आता आमच्यात दुरावा नाही. केवळ 30-35 जागांवर निर्णय होणे बाकी आहे. ते लवकरच होईल. त्या निर्णयावर राज्यात चर्चा झाली नाही तर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही आगाऊ रक्कम दिली आहे. आचारसंहितेच्या समस्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

'मविआ'च्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता

दरम्यान, आज (19 ऑक्टोबर) रात्री महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय होणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर उद्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज रात्री महाविकास आघाडी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेस 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रियाEknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गारNagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरूNCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
Embed widget