एक्स्प्लोर

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार प्रोफेसरची भूमिका; हिट मालिकांमध्ये केलंय काम

 कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेत मृण्मयी ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? याबाबत जाणून घ्या

Kunya Rajachi Ga Tu Rani:  कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मालिकेचे प्रोमो, शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुंजा-कबीरच्या आयुष्यात नेमकं कोणतं नाट्य घडणार हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. गुंजा आणि कबीरसोबतच या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे मृण्मयी. मृण्मयी ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात 'कुन्या राजाची गं तू रानी'  या मालिकेत मृण्मयी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल...

 अभिनेता हर्षद अतकरी हा  'कुन्या राजाची गं तू रानी'  या मालिकेत कबीर  ही भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री शर्वरी जोग ही या मालिकेत गुंजा ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेत मृण्मयी नावाच्या प्रोफेसरची भूमिका  अभिनेत्री पुर्णिमा डे साकारणार आहे. 

कबीरवर निस्स्मीम प्रेम करणारी मृण्मयी मराठीची प्रोफेसर आहे. नखशिखांत सुंदर आणि श्रीमंतीत वाढलेली. कुणावरही पटकन विश्वास न टाकणारी, पण एखाद्यावर विश्वास जडला की अखेरपर्यंत निभावणारी अशी ही मृण्मयी. अभिनेत्री पुर्णिमा डे मृण्मयीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

पुर्णिमा डेनं 'कुन्या राजाची गं तू रानी'  या मालिकेच्या आधी  झटका या चित्रपटात काम केलं आहे. तसेच तिनं या आधी तुझेच मी गीत गात आहे, रात्रीस खेळ चाले 3 या हिट मराठी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच तिनं प्रीवेडिंग या शॉर्टफिल्ममध्ये देखील काम केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Purniemaa (@purniemaadey_official)

मृण्मयी या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना पौर्णिमा म्हणाली, ‘मी खूप दिवस ज्या भूमिकेच्या शोधात होते ती भूमिका मला मृण्मयीच्या रुपात भेटली. मनाने हळवी मात्र मनस्वी असं हे पात्र आहे. या पात्राला खूप शेड्स आहेत. तिच्या सधन असण्याचा तिला अजिबात अहंकार नाही. मात्र कबीर ने तिच्यापासून कधी काही लपवू नये इतकीच तिची भाबडी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृण्मयी दुष्ट नाही. नावाप्रमाणेच ती मृदू स्वभावाची आहे. मराठीची प्रोफेसर असल्यामुळे समजून घेणं आणि समजावून सांगणं तिला उत्तम जमतं. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. स्टार प्रवाह वाहिनी, आमच्या निर्मात्या स्मृती शिंदे आणि डिझायनर वैशाली देशमुख यांनी खूप उत्तमरित्या माझा लूक डिझाईन केला आहे. मला हे पात्र साकारताना अतिशय आनंद मिळतोय. प्रेक्षकांनाही हे पात्र आणि ही मालिका नक्कीच आवडेल.'

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kunya Rajachi Ga Tu Rani:'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील गुंजा 'या' अभिनेत्याला करतीये डेट; शर्वरी जोगनं सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Embed widget