एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर; 25 जूनला होणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ (Ashok Saraf) ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. 

प्रेक्षकांसाठी पर्वणी!

दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेदेखील सहभागी होणार आहेत.   

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी 'कोण होणार करोडपती'चा मंच उजळून निघणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. 

अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक हीट सिनेमे आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा 'ययाती'पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर'पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना सिनेसृष्टीत पदार्पण करून 50 वर्षं पूर्ण झाली आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा आणि त्यांचे बंधू यांनी या वेळी सांगितले. 

लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम  केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही  मामांनी सांगितल्या. 'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' सिनेमातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग  अधिकच रंगतदार होणार आहे. 

अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. 

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kajol : 'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget