एक्स्प्लोर
कपिलचा नवा शो, गुत्थी आता डॉक्टर, दादी कोणत्या भूमिकेत?
मुंबई : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा म्हणून लवकर कपिल शर्मा आणि त्याची टीम तुमच्या भेटीला येत आहे. या शोचं नाव 'द कपिल शर्मा शो' असेल. शिवाय हा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'पेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे.
आधीच्या शोमध्ये कपिल म्हणजे बिट्टू त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. पण आता तो कप्पू ही भूमिका साकारणार असून तो नातेवाईकांकडे राहताना दिसेल.
दादीची भूमिका साकारणारा अली असगर आता कपिलचा नातेवाईक असेल, जो शांतीवन को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये राहत आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' मध्ये प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी बिट्टूटूच्या कुटुंबाने घेतली होती, मात्र आता ते काम ही को-ऑपरेटिव्ह सोसायटी करेल.
याशिवाय कपिलच्या कॉमेडी कुटुंबात 'गुत्थी' या पात्राने आजवर सगळ्यांना खूप हसवलं. पण यावेळी सुनील ग्रोव्हर डॉक्टरच्या भूमिकेत असून, दोन सुंदर नर्ससोबत तो लाफ्टरचं इंजेक्शन देताना दिसेल.
तर बिट्टूचा नोकर आता मोठा माणूस झाला आहे. नवीन शोमध्ये चंदन प्रभाकर सोसायटीत चहाची टपरी लावणार आहे. प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा बनवलेली 'पलक' या शो मध्ये वेगवेगळे पात्र साकारताना दिसणार आहे.
नवज्योतसिंह सिद्धूने 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये जजची भूमिका साकारुन सर्वांचं मनोरंजन केलं होत. पण नवीन शोमध्ये ते सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विद कपिल' शो कलर्सवर टीव्ही प्रसारित व्हायचा. सर्वात लोकप्रिय शो म्हणून लोकांच्या मनात वेगळी जागा बनवली होती. या कार्यक्रमाने 250 भागांचा टप्पाही गाठला होता. मात्र जानेवरीच्या शेवट्च्या आठवड्यात हा शो अचानक बंद करण्यात आला.
'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद झाल्यावर प्रेक्षकही निराश झाले होते. शिवाय हा शो बंद झाल्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. कलर्सवर सुरु झालेला ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’साठी कपिलचा शो बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. एकाच चॅनल वर एकसारखे शो सुरु करुन दोन्ही शोमध्ये मुद्दाम स्पर्धा सुरु करण्यात आली होती, असा आरोप कपिलने केला होता.
तर दुसरीकडे नव्या शोसाठी सोनी टीव्हीने कपिलला भरगच्च रक्कम दिल्याचं बोललं जात आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान हजेरी लावणार आहे. येत्या 23 एप्रिलपासून या 'द कपिल शर्मा शो'चा पहिला एपिसोड प्रसारित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement