Kitchen Kallakar : 'आपला सिद्धू' तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान कसं पेलणार?
Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिनेता सिद्धार्थ जाधव दिसणार आहे.
Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' हा कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कुकरी शोचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. "आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार". म्हणत या कुकरी शो ची सुरुवात झाली होती. 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिनेता सिद्धार्थ जाधव दिसणार आहे.
किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना मात्र खूप मजा येत आहे. एनर्जीचं पावर हाऊस म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या मंचावर येऊन आपली पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल की नाही हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
View this post on Instagram
सिद्धार्थला महाराज तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान देणार आहेत. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल की महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. सिद्धू सोबत किचन कल्लाकारच्या आगामी भागात सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे कलाकारदेखील दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
Pavitra Rishta Season 2 : अर्चना आणि मानव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला,'पवित्र रिश्ता सीझन 2' चा ट्रेलर प्रदर्शित
Ala Vaikunthapurramuloo Hindi Teaser : अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुटापुर्रामुलू' सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha