Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सासूबाईंनी लावली 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी
Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'च्या मंचावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सासूबाईंनी हजेरी लावली आहे.
Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण या आठवड्यात मात्र छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सासूबाईंनी 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी लावली आहे.
अभिनेत्री उषा नाडकर्णी, सविता मालपेकर आणि देवमाणूस मधील सरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार या अभिनेत्रींनी 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी लावली आहे. या अभिनेत्रींनी छोटा पडदा चांगलाच गाजवला आहे. या सगळ्या सासू एकाच मंचावर असल्याने प्रेक्षकांना मात्र चांगलाच दंगा पाहायला मिळाला. कुठली सासू भारी ठरतेय याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते.
महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात. 'किचन कल्लाकार'च्या मंचावर नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. या मंचावर कधी राजकारणी नेते येतात, तर कधी बच्चे कंपनी त्यामुळे प्रेक्षकदेखील 'किचन कल्लाकार' कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात.
View this post on Instagram
याआधी बच्चेकंपनीने केला होता कल्ला
अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु, नाळ चित्रपटातील चेत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर याआधी किचन कल्लाकारमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी किचन कल्लाकारच्या मंचावर प्रेक्षकांची लाडकी ‘परी’ म्हणजे मायरा वायकुळ, सारेगमपची फायनलिस्ट स्वरा जोशी आणि ‘खारी बिस्कीट’मधली ‘खारी’ म्हणजे वेदश्री खाडिलकर सहभागी झाली होती. या बच्चेकंपनीने चांगलीच धमाल केली होती.
संबंधित बातम्या