Kiran Mane : "प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून"; 'मुलगी झाली हो'चा उल्लेख करत किरण माने म्हणाले,"माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी…"
Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर या अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे.

Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. दरम्यान किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांचं कौतुक केलं आहे.
किरण माने यांनी 'रमा राघव' (Rama Raghav) या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांची भेट घेतली आहे. किरण आणि प्राजक्ता या जुन्या मैत्रीणींची भेट झाल्यानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. याआधी त्यांनी 'मुलगी झाली हो' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. 'मुलगी झाली हो' या मालिकेत किरण माने महत्त्वाची भूमिका साकारत होते. पण नंतर काही कारणाने त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांची पोस्ट काय? (Kiran Mane Post)
प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकरबद्दल बोलताना किरण माने यांनी लिहिलं आहे,"काही नातीच अशी असतात, ज्यांची कित्येक काळ भेट नाही झाली तरी ती ताजी टवटवीत रहातात. तब्बल दोन वर्षांनंतर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर भेटल्या. ते ही अचानक 'रमा राघव' च्या सेटवर. किती बोलू आणि किती नको असं झालं... धमाल केली आम्ही".
View this post on Instagram
किरण माने यांनी लिहिलं आहे,"मुलगी झाली हो'च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना... अचानक स्वत:च्या करीयरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी. या दोघींसोबत शितल गिते आणि गौरी सोनारही होत्या. "किरणसर, वेळ पडली तर अभिनय सोडू पण तुमच्यावर विनाकारण होणारे आघात आता गप्प बसून पाहू शकत नाही. आम्ही तीन वर्ष रोज पहातोय तुम्हाला. भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत." असं म्हणत प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रणरागिणी निर्भिडपणे 'सत्य' बोलल्या".
किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"माझ्यासाठी आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि अद्भूत क्षण होता. जगात स्त्रियांना आदर आहे तो अशा निडर सावित्रीच्या लेकींमुळेच. प्राजक्ता-श्वेता, तुम्हाला कामात बिझी असलेलं पाहून खूप भारी वाटलं... आनंदी रहा... खुश रहा... लब्यू".
संबंधित बातम्या























