एक्स्प्लोर

Kiran Mane: "भल्याभल्या वाघांची शेळी झालीये"; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane: किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी विविध घटनांवर भाष्य केलं आहे. किरण माने यांनी या पोस्टमध्ये पुण्यातील (Pune) गांधी भवन (Gandhi Bhavan) येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देखील दिली आहे.

किरण माने यांची पोस्ट

 किरण माने यांनी फेसबुकवर महात्मा गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो यहाँ होता ना… तो ये डरे हुए लोगों का देश देख के बहुत रोता था यार!" लगे रहो मुन्ना भाईमधला मुन्नाभाईचा हा डायलाॅग त्यावेळी फक्त आवडला होता. आजच्या काळात रोज आठवून अंगावर शहारा येतो. खरंच हा देश 'डरे हुए' किंवा 'डराए गये' लोगोंका देश झालाय यात शंका नाही. भल्याभल्या वाघांची शेळी झालीये. नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सगळीकडे आज भेदरलेले लोक दिसतात. ईडीच्या भितीनं भलेभले गामा लाचार होऊन, विचारधारेची सुरळी करून गपगुमान या कळपातनं त्या कळपात जाऊ लागलेत. आपली लफडी-कुलंगडी बाहेर काढून, आजवर दाबलेल्या फायली ओपन केल्या तर? तिथपासून ते सामान्य माणूसबी हादरलाय. ही पोस्ट केली तर मला अर्वाच्य शब्दांत ट्रोल तर करणार नाहीत ना? ती कमेंट केली तर मला मेसेंजरमध्ये धमक्या तर येणार नाहीत ना? ते विधान केले तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना? या भितीनं अन्याय सहन करून मूग गिळून गप्प बसलेले लोक जागोजागी दिसत आहेत. मग स्त्रियांना विवस्त्र करुन धिंड काढलेली काळीज पिळवटणारी घटना घडूदेत किंवा बलात्कारीत मुलगी रक्तबंबाळ होऊन मदत मागत रस्त्यावरून फिरतानाचं विदारक दृश्य दिसू देत. महागाई-बेरोजगारीनं कंबरडं मोडूदेत किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कुणा निरपराध्याची हत्या घडवुन आणली जाऊदेत.मिडीयासकट सगळे चिडीचूप आहेत. केली बातमी, अन् नोकरी गेली तर? शेवटी पोटापाण्यावर आल्यावर काय करणार माणूस?

पुण्यातील 'गांधी भवन' येथे होणाऱ्या कार्यक्रमाची दिली माहिती

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'सगळीकडे फक्त भिती, भिती आणि भितीचं साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत गांधी जयंती सप्ताह साजरा करताना परीणामांची पर्वा न करता भवतालावर, सद्यस्थितीवर निर्भिडपणे बोलून ती साजरी करण्याची ही कल्पना लै आवडली मला. यात डॉ. मणिंद्रनाथ ठाकूर, पी. साईनाथ, सुधींद्र कुलकर्णी असे अनेक मान्यवर बोलणार आहेत. पुण्यात 'गांधी भवन'मध्ये होणार्‍या या सप्ताहातल्या एका परीसंवादात बोलायला मलाही आमंत्रित केलेय.' पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी त्यांच्या चाहत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

संबंधित बातम्या:

Kiran Mane: "सगळ्या सिनेमांमध्ये देखील फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget