एक्स्प्लोर

Kiran Mane: "सगळ्या सिनेमांमध्ये देखील फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

किरण माने (Kiran Mane) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच किरण माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज  (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांच्याबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तसेच सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती यावर भाष्य केलं आहे.

किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "तुम्हाला ठावं हाय का? शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदरानं कर्ज देणारे पहिले राज्यकर्ते कोण होते? आपले छत्रपती शिवाजी महाराज ! महाराजांचं नाव आजकाल फक्त धर्माच्या अंगानं सोयीस्कररीत्या पुढं आणलं जातं. सगळ्या सिनेमामध्ये देखील फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून दाखवल्या जातात. त्यातनं महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील नव्वद टक्के बाजू लपवून ठेवून, प्रेक्षकांमध्ये नको ती एनर्जी ठासून भरली जाते. शिवरायांना 'महान' तर म्हणायचं, त्यांचा जयजयकार तर करायचा...पण रयतेच्या हिताचे निर्णय घेणारा, सर्व जातीधर्मांचा आदर करणारा, समता आनि मानवताधर्म जपणारा 'जाणता राजा' जानूनबुजून दुर्लक्षित ठेवायचा. मग अशा परिस्थितीत 'शेतकर्‍यांची मनापासून काळजी घेणारा' हा राजा तुमच्यापर्यंत ते कसा पोहचू देतील?"

"आजच्या घडीला आपण भयान दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पडला तर तिच्यायला अस्सा मुसळधार पडतोय, का हाय नाय ते सगळं धुवून नेतोय. आन् नाय पडला तर पाक वाळून, करपून राखरांगोळी होतीय. शिवरायांना अतिप्रिय असलेल्या शेतकर्‍याचं आज लै लै लै बेक्कार हाल चाललेत. महिनाभरापुर्वी आमचं शुटिंग एका शेताजवळ चाललं होतं. तिथं पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकरी स्प्रिंकलरनं सोयाबीनला पाणी द्यायचे. पण लाईट सारखी जायची यायची. चोवीस तासात अर्धा गुंठाबी रान भिजायचं नाही. रात्री-अपरात्री कमरेएवढ्या वाढलेल्या पिकातनं, पायात सळसळनार्‍या जनावरांची पर्वा न करता, जीवावर उदार होऊन फिरनारे शेतकरी मी बघितलेत. लै जीव कासावीस व्हायचा बघून."

खरंतर हे भयाण वास्तव न्युज चॅनलवरनं रोज समोर आणलं पायजे. पण कोण उठून कुठल्या पक्षाच्या वळचनीला गेला, कुनाच्या मागं इडी लागलीय. कुणा नेत्याची सेक्स क्लीप सापडली, कुणाची खुर्ची धोक्यात हाय. कुणी किती आमदार किती खोके मोजून इकत घेतले. ह्यातनं आपलं महाराष्ट्राचं राजकारण बाहेरच पडंना ह्येज्यायला. या गदारोळात वरडून वरडून दुष्काळाची पूर्वकल्पना देणारे आवाज बसले. जगाच्या पोशिंद्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शेतकरी आत्महत्या वाढल्या.'इलेक्शन' डोळ्यापुढे ठिवून घोडेबाजारात रमलेले नेते दुष्काळासाठी उपाययोजना आन् तयारी करायचंच इसरून गेलेत ! बसा बोंबलत.

बरं आपण आपल्याच सरकारला हक्कानं सोशल मिडीयावरनं जाब इचारावा, तर लगी ट्रोल पिलावळीची जुनी पाक चोथा झालेली कॅशेट सुरू, 'पूर्वीच्या सरकारनं काय केलं'. मग आपण म्हणार,"ते बिनकामाचे होते म्हनून तुमाला आनलं ना? तुमी काय केलं?" ह्या भांडनात मूळ इषय आन् आमचा शेतकरी परत बाजूला पडनार." पुढे किरण माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांनी त्यांच्या  सरदारांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख देखील पोस्टमध्ये केला.

संबंधित बातम्या:

Kiran Mane: "एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा..."; 'जवान' मधील या अभिनेत्याचं किरण मानेंकडून तोंडभरुन कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget