(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karan Mehra-Nisha Rawal : निशा रावलच्या अडचणी वाढणार, करण मेहराच्या बाजूने उभी राहिली कश्मीरा शाह!
Karan Mehra-Nisha Rawal : अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) प्रकरणी त्यांची मैत्रीण अभिनेत्री कश्मीरा शाहने (Kashmera Shah) प्रथमच मौन सोडले आहे.
Karan Mehra-Nisha Rawal : अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) प्रकरणी त्यांची मैत्रीण अभिनेत्री कश्मीरा शाहने (Kashmera Shah) प्रथमच मौन सोडले आहे. कश्मीरा शाहने या गोष्टी दिसतायत त्यापेक्षा किती वाईट आहेत, हे उघड केले. कश्मीरा शाह अभिनेत्री निशा रावल आणि करण मेहरा यांची जवळची मैत्रीण आहे. टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणात कश्मीरा शाहने उडी घेतली आहे.
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात गेल्या 14 महिन्यांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, करण मेहराने निशावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय निशा आणि तिचा प्रियकर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे करणने सांगितले होते.
काय म्हणाली कश्मीरा शाह?
नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरा शाहने सांगितले की, याआधी तिला निशाचा कॉल आला होता. तिने त्यांच्या नात्यात काहीच ठीक सुरु नसल्याची गोष्ट सांगितली. त्यानंतर काही दिवसांनी रात्री साडेबारा वाजता रोहित वर्माचा फोन आला की, करणने निशाला मारहाण केली आहे. कश्मीराच्या म्हणण्यानुसार, करण साधा मच्छर देखील मारू शकत नाही, त्यामुळे तो हे कृत्य करूच शकत नाही. त्यानंतर करणनेच कश्मीराला या प्रकरणात साक्षीदार होण्यास सांगितले होते.
एवढेच नाही तर कश्मीरा शाहने इतरही अनेक खुलासे केले आहेत. अलीकडेच करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मीरा शाहचे आभार व्यक्त केले होते आणि त्यानंतर कश्मीरा शाह करणची पूर्व पत्नी निशावर टीका करताना दिसली होती.
करण-निशाचा घटस्फोट
गेल्या वर्षी निशाने पती करणवर अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला, तेव्हा या जोडप्यामधील भांडण समोर आले होते. दोघांमधील संबंध इतके बिघडले होते की, निशाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तसेच, दोघेही आपला मुलगा कविशचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. निशाने करणवर आरोप करत केस दाखल केली होती. तिने पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोपही लावला होता. ज्यावर प्रतिक्रिया देताना करणने हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून, मुलाच्या ताब्याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. करण-निशा यांनी 2012मध्ये प्रेमविवाह केला होता.
हेही वाचा :
टीव्ही अभिनेता करण मेहरा वादाच्या भोवऱ्यात; पत्नी निशा रावलचा करणवर फसवणुकीचा आरोप
In Pics : घरगुती हिंसा, अटक आणि जामीन ....; ये रिश्ता क्या कहलाता है?