(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : 'तुझ्यात अक्कल नाहीय, अक्कलशून्य', जान्हवी अन् घनःश्याममध्ये तुफान राडा
Bigg Boss Marathi Day 38 : बिग बॉस मराठीच्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. जान्हवी अन् घनःश्याममध्ये तुफान राडा पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात दिवस 38 वा दिवस सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरात राडा पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. यामुळेच जान्हवी आणि घनःश्याम एकमेकांची अक्कल काढताना दिसतील.
जान्हवी अन् घनःश्याममध्ये तुफान राडा
आज बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर आणि घन:श्याम दरोडे यांच्यात चांगलंच भांडण झाल्याचं दिसणार आहे. दोघांचे खटके उडताना पाहायला मिळणार आहेत. जान्हवी आणि घन:श्याम यांच्यातील वादापासून इतर सदस्य मात्र लांब राहताना दिसणार आहे. या दोघांच्या भांडणाचा घरातील इतर सदस्यांवर काहीही फरक पडणार नाही. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
नॉमिनेशन टास्कनंतर बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं
बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालताना दिसत आहे. यावेळी जान्हवी म्हणते, "सगळ्यांना माहिती आहे, तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो, "मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही". पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,"अक्कल शून्य आहेस तू". यानंतर घन:श्याम तिला चल-चल म्हणताना दिसत आहे. या प्रोमोवरुन बिग बॉसच्या घरात आज तापमान वाढल्याचं पाहायला मिळणार आहे.
जान्हवी आणि घनःश्यामनं काढली एकमेकांची अक्कल
View this post on Instagram
पॅडी दादा घेतायत सूरजची शिकवणी
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते. त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत, "अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस. तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको".
महत्त्वाच्या इतर बातम्या :