Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या...
Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर 25 लाख मानधन घेतात असे म्हटले जात आहे.
Mahesh Manjrekar : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे तीन पर्व महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) होस्ट केले असून चौथे पर्वदेखील महेश मांजरेकर होस्ट करणार आहेत. या कार्यक्रमाच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर 25 लाख मानधन घेतात असे म्हटले जात आहे.
महेश मांजरेकर दर आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेत असतात. त्यांचा वीकेंडचा डाव कार्यक्रमात रंगत आणतो. आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते बिग बॉस या कार्यक्रमासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असून नव्या पर्वासाठी त्यांच्या मानधनात आणखी वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महेश मांजरेकर यांचे नेटवर्थ चाळीस कोटींच्या घरात आहे. तसेच ते एका सिनेमासाठी 30-50 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नुकताच त्यांचा 'दे धक्का 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षक बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा दुसऱ्याच अभिनेत्याच्या हातात? पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर...
Bigg Boss Marathi Season 4 Host : अखेर प्रतिक्षा संपली; 'बिग बॉस मराठी 4' महेश मांजरेकरच होस्ट करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)