एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 4 Host : अखेर प्रतिक्षा संपली; 'बिग बॉस मराठी 4' महेश मांजरेकरच होस्ट करणार

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी 4'च्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्याने चौथा सीझन कोण होस्ट करणार आणि कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सांभाळणार आहेत. 

कलर्स मराठीने महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे प्रोमो शेअर केले आहेत. यात मांजरेकर म्हणत आहेत,"खेळाडू नवे, घर नव्हे.. आणि होस्ट?  वर्गात विद्यार्थी नवीन असतात. पण मास्तर तोच महेश वामन मांजरेकर. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये मी घेणार आहे 'वेगळी शाळा' बिग बॉस मराठी लवकरच कलर्स मराठीवर". महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी 4' होस्ट करणार असल्याने चाहते आनंदी झाली आहेत. 

चौथा सीझन महेश मांजरेकर होस्ट करणार? सिद्धार्थ जाधव करणार की आणखी कोणता नवा चेहरा समोर येणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.  मागील तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांनी आजारपणामुळे काही भागांमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यामुळे चौथ्या सीझनची धुरा महेश मांजरेकर सांभाळतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 

पिपिंग मूनला दिलेल्या एका मुलाखतीत मांजरेकर म्हणाले होते, मी काही या बिग बॉस शोचा बांधील नाही. माझा तीन वर्षांचा करार होता. मी तीन वर्ष इमानेईतबारे हे काम केलं. हा मला आताही त्यांनी घेतलं तर, करायला आवडेल. मी तितक्याच मेहनतीने ते काम करेन. पण, जर दुसरं कुणी होस्ट करणार असेल, तर मी त्यालाही प्रोत्साहन देईन आणि तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम बघेन".

बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा दुसऱ्याच अभिनेत्याच्या हातात? पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Madhavi Nimkar Video: मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
Rasika Vengurlekar New Home: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिली Good News; स्वप्न झालं पूर्ण, घेतलं हक्काचं घर, पतीसोबतचे PHOTOs चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिली Good News; स्वप्न झालं पूर्ण, घेतलं हक्काचं घर, पतीसोबतचे PHOTOs चर्चेत
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
Aniket Saraf on Ashok Saraf: कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO
कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget