Happy Birthday Myra Vaikul: वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी 'परी' मालिकेतील एका भागासाठी किती मानधन घेते?
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी अर्थात मायरा वैकुळचा आज वाढदिवस आहे.
![Happy Birthday Myra Vaikul: वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी 'परी' मालिकेतील एका भागासाठी किती मानधन घेते? Happy Birthday Myra Vaikul Debuting in the marathi serial world at the age of four how much does Pari who has millions of followers on social media charge for an episode of the Mazhi Tuzhi Reshimgath marathiserial Happy Birthday Myra Vaikul: वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी 'परी' मालिकेतील एका भागासाठी किती मानधन घेते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/aa1132d0a2067c9a5634a3faa1d02e241674367696165254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या परीचा (Pari) अर्थात मायरा वैकुळचा (Myra Vaikul) आज वाढदिवस आहे. मायरा आज तिचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
बालकलाकार मायराने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. अल्पावधीतच तिने आपल्या हसण्याने, बोलण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मायरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून आपल्या फोटो आणि व्हिडीओने चाहत्यांना भुरळ पाडत असते. इंस्टाग्रामवर मायराचे लाखो चाहते असून ती सोशल मीडियावर स्टार बनली आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका मायराला कशी मिळाली?
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेदरम्यान झी मराठी एका गोड मुलीच्या शोधात होते. दरम्यान त्यांना सोशल मीडियावर छोट्या मायराचे फोटो दिसले. मायराचा नटखट अंदाज त्यांच्या पसंतीस उतरला. त्यावेळी कोरोना असल्याने त्यांनी मायराच्या आई-वडिलांना विचारणा केली. मायराच्या कुटुंबीयांनी मालिकेसाठी होकार दिला आणि परी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मायराचे फोटो आणि रिल्स चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. मायराचे आई-वडील मायराच्या इंस्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असतात. याचाच फायदा मायराला झाला.
'कमावतो किती?' विचारणारी मायरा एका भागासाठी किती मानधन घेते?
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या प्रोमोमध्ये मायरा म्हणताना दिसत होती,"कमावतो किती?". हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मालिकेत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत मालिकेतील इतर कलाकारांना तोडीस तोड मानधन घेते. मायराने वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण केलं असलं तरी ती एका भागासाठी 10 हजार मानधन घेते.
मायराचा वाढदिवस होणार खास
मायराचा सहावा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास असणार आहे. मायराच्या पहिल्या-वहिल्या मालिकेचा अर्थात 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. हा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना रात्री 9 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. आता ही मालिका बंद होणार असल्याने तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
View this post on Instagram
मायराच्या आई-वडिलांनी तिच्या वाढदिवसाचं खास आयोजन केलं आहे. कुटुंबीय आणि मायराच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत मायरा तिचा सहावा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाच्या पार्टीत 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागाचं स्क्रिनिंग होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)