Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
![Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ My Tujhi Reshimagath Fame Pari shared a special video on the occasion of Ashadhi Ekadashi Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/f039c078868479e4c4c81309879657341657452505_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Myra Vaikul : आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील (Myra Vaikul) आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मायराने पारंपरिक परकर-पोलकं घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे. पाणी घातले तुळशीला..वंदन करते देवाला सुखी ठेव माझ्या सर्व मित्रांना असं म्हणत मायराने विठुरायाला गोड साकडं घातलं आहे. व्हिडीओमध्ये मायरा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पुजा करत आहे. मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा' असे कॅप्शन देत छोट्या मायराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर मायराचे 50 हजार फॉलोअर्स आहेत. आषाढी एकादशीनिमित्तचा मायरा व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
मायराचे युट्यूब चॅनल
युट्यूबवर 'मायरास कॉर्नर' नावाचे मायराचे युट्युब चॅनल आहे. त्यावरील तिचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यावर मायरा योगा करताना, खेळताना, घरच्यांसोबत वेळ घालवताना, केक बनवताना दिसून येते. मायराचे सोशल मीडिया अकाउंट तिचे आई-वडील सांभाळतात. युट्यूब चॅनलमुळे लहानपणापासूनच तिला कॅमेरा फेस करण्याची सवय आहे. मायरा आणि तिचे आई-वडील अनेकदा सारख्या रंगाचे कपडे घालतात. मायरा आणि तिची आई अनेकदा फोटोशूट करत असतात. मायराचा हळदीकुंकू समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)