(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला; नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या मालिकेत दिसणार 'ही' बालकलाकार
Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका येत्या 18 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. येत्या 18 फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे याविषयी देखिल प्रेक्षकांमध्ये कुतुहल आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार 'ही' बालकलाकार
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या प्रोमोत दिसणारी ही चिमुकली म्हणजेच बालकलाकार आरोही सांबरे. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत आरोही ओवीच्या भूमिकेत दिसेल. याआधी आरोही स्टार प्रवाहच्या 'मुलगी झाली हो', 'शुभविवाह' आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून भेटीला आली आहे. आरोहीला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची देखिल आवड आहे. यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचंदेखील प्रशिक्षण घेत आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतली ओवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचं कथानक काय असेल? (Gharoghari Matichya Chuli Story)
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली'.
सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
View this post on Instagram
कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.
संबंधित बातम्या