Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू
Farmani Naaz : 'हर हर शंभू' गाणं गाणारी फरमानी नाज 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस (Bigg Boss) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. लवकरच या कार्यक्रमाचे सोळावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात 'हर हर शंभू' गाणं गाणारी फरमानी नाज (Farmani Naaz) सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, फरमानी नाजला 'बिग बॉस 16' साठी विचारणा झाली आहे. फरमानीदेखील या गोष्टीवर विचार करत आहे. याआधी फरमानी तिचा भाऊ फरमानसोबत 'इंडियन आयडल' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. फरमानीचे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले 'हर हर शंभू' हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फरमानी नाज कोण आहे?
फरमानीला गाणं गाण्याची प्रचंड आवड आहे. फरमानीचं गाणं राहुल नावाच्या एका व्यक्तीने ऐकलं आणि ते रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फरमानीने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. युट्यूबवर फरमानीचे 38.4 लाख सब्सक्रायबर आहेत. फरमानी नाज आणि फरमानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. इंडियन आयडलच्या 12 व्या पर्वात सहभागी होण्याची संधी फरमानीला मिळाली होती.
'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू
'बिग बॉस 16'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा नेहमीप्रमाणे सलमान खान सांभाळणार आहे. यंदाच्या पर्वात 'खतरों के खिलाडी 12' मधील काही स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच यंदाच्या पर्वाची थीम अॅक्वा अशी असणार आहे.
संबंधित बातम्या