Bigg Boss 18: 'करण जीममध्ये विचित्र कमेंट करायचा..', नायरा बॅनर्जीनं बिगबॉसच्या घराबाहेर पडताच केला खळबळजनक खुलासा, म्हणाली..
नायरानं घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील तिच्या अनुभवाविषयी सांगितलं. जीममध्ये व्यायाम करत असताना करण अतिशय विचित्र कमेंटस करायचा असं ती म्हणाली.
Bigg Boss 18: बिगबॉसच्या यंदाच्या विकेंड का वारमध्ये नायरा बॅनर्जीला घरातून बाहेर काढण्यात आलं. यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. प्रत्येकजण आता आपल्या गेमवर लक्ष देताना दिसत आहे. दरम्यान, नायरा बॅनर्जीने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापडल्या करणवीर मेहरा याच्याविषयी एक धक्कादायक खुलासा केलाय. तिनं शिल्पा शिरोडकर आणि थेट सलमान खानवरही राग काढल्याचं दिसलं. तिच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करण जिममध्ये विचित्र कमेंट्स करायचा
नायरानं घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील तिच्या अनुभवाविषयी सांगितलं. जीममध्ये व्यायाम करत असताना करण अतिशय विचित्र कमेंटस करायचा असं ती म्हणाली. मी त्याला भाव दिला नाही त्यामुळे त्यानं असं केलं असावं. पण मला त्याच्यासोबत याप्रकारे जोडलं जायचं नव्हतं. त्यानं खेळाची सुरुवात चांगली केली असली तरी तो लोकांना ट्रिगर करत होते. करणवीरचं पुढचं काय पाऊल असणार? यावर ती म्हणाली, करणवीर खूप हुशार आहे. असंच खेळत राहिला तर तो पुढे जाऊ शकतो.
सलमानने पक्षपात केला? नायरा म्हणाली..
सलमान खानच्या फिडबॅकच्या आधारे घरातील स्पर्धकांनी माझ्याविषयी गैरसमज करून घेतला. त्यांच्याकडून तयार केली गेलेली ती धारणा होती. त्यांनी पक्षपात केला असं ती म्हणाली. दरम्यान याआधीच्या विकेंड का वार मध्ये नायरा बॅनर्जीला सलमानने इशाराही दिला होता. नायरानं आपल्या एलिमिनेशनवर नाराजी दर्शवत तिला खूपच कमी वेळ स्क्रीनवर दिल्याचं सांगितलंय. नुकत्याच एका मुलाखतीत तिने आपल्यावर पक्षपात केल्याचं म्हणाली..
शिल्पा शिरोडकरवरही काढला राग
नायराने सलमान खान, करणवीरसह शिल्पा शिरोडकरवरही तिचा राग काढल्याचं दिसलं. ती म्हणाली, मी पाहिलं शिल्पाजींनी मला दूर ठेवायला सुरुवात केली होती. मी त्यांच्याशी नाही तर अविनाशशी भांडले होते. पण मी पण जास्त मस्का मारला नाही. त्यामुळं मी आवडीची ठरले नसेन. असं नायरा म्हणाली.