एक्स्प्लोर

Bigg Boss 18: '..माज कशाला दाखवतोस', एकतानं विवयनचा ॲटिट्यूड ठेचला, बिगबॉसच्या घरातला एकताचा रुद्रावतार समोर

चाहत आणि विवियन दोघांचीही घरात चांगलीच खडाजंगी सुरु असते. एकता कपूरनं घरात येत चांगलाच ड्रामा केल्याचं शुक्रवारच्या एपिसोडमध्ये दिसलं.

Bigg Boss 18: शुक्रवारी मनोरंजनाच्या दुनियेत बिगबॉसच्या घरात एकता कपूरने घरातल्या स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं दिसलं. यंदाचा विकेंड का वार टेलिविजनच्या हिंदी मालिकांची निर्माती एकता कपूर आणि रोहित शेट्टी होस्ट करणार आहेत.  कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोवरून सध्या एकता कपूर घरातील स्पर्धकांना जाब विचारताना, रागवताना आणि त्यांच्या चुका दाखवताना दिसतेय. या प्रोमोनुसार, एकता कपुरनं घरातील स्पर्धकांचा लाडक्या विवियनला कामाचा माज दाखवू नको अशा शब्दात गप्प केल्याचं दिसतंय. घरातील स्पर्धकांना त्यांच्या वागण्यावरून तिनं चांगलंच सुनावल्याचं दिसलं.

विवियनचा ऍटिट्यूड ठेचत केलं गप्प

एकता कपुरनं घरातील सदस्यांचा लाडक्या विवियनला तू कामाचा माज या घरात दाखवू नकोस असं म्हणत तू आजवर केलस तरी काय? असा सवाल विवियनला करत त्याचा ॲटिट्यूड ठेचल्याचं दिसलं. मी तुला लाँच केल्यामुळं मला तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं एकता म्हणाली. विवियन सारखं या इंडस्ट्रीत आठ दहा वर्ष काम करत असल्याचं सांगतो. त्यावर मग काय झालं...असं एकता म्हणाली. घरातील सगळ्या सदस्यांनी तुला डोक्यावर बसवलं आहे. यावर विवियनने मी असं कधी म्हणलं नसल्याचं म्हणताच मग कामाचा माज कोणाला दाखवतोस असा सवाल करत एकतानं विवयनला सुनावलं. 

तू बिगबॉसच्या घरात आलासच कशाला..

विवियन घरातल्या चर्चांपासून दूर पळतो अशी सगळीकडे चर्चा आहे. त्यावरही एकता कपूरने विवियनला असंच वागायचंय तर तू बिगबॉसच्या घरात कशासाठी आलास असं म्हणत त्याचे कान पिळले. कलर्स टीव्हीने नुकताच एकता कपूरचा घरातील रुद्र अवतार प्रोमोमधून शेअर केलाय.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

चाहतलाही दिला रियालिटी चेक 

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात चाहत पांडे मी मुलगी आहे माझ्याशी असं वागू नका.. मुलींशी बोलण्याची ही पद्धत आहे का.. असं वारंवार बोलताना दिसत आहे. तिच्या या बोलण्यावर एकता कपूरने चाहत पांडेलाही रियालिटी चेक दिल्याचं दिसलं. पर्सनल हायजिनवरून चाहत ज्याप्रकारे घरात वावरली तो मुद्दा पुरुष किंवा स्त्री असा नाही असे एकता कपूरने सांगितलं. तुम्ही जेव्हा महिला म्हणून बोलता तेव्हा संपूर्ण स्त्री वर्गाला तुम्ही त्यात ओढून घेता. स्वतःसाठी खेळा.. असं म्हणत एकताने चाहतलाही चांगलंच सुनावलं. चाहत आणि विवियन दोघांचीही घरात चांगलीच खडाजंगी सुरु असते. एकता कपूरनं घरात येत चांगलाच ड्रामा केल्याचं शुक्रवारच्या एपिसोडमध्ये दिसलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget