एक्स्प्लोर
निर्माती एकता कपूर आई बनली!
तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचा जन्म झाला होता, तेव्हा एकतानेही आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुंबई : टेलिव्हिजन क्वीन निर्माती एकता कपूर आई बनली आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि भाऊ तुषार कपूरच्या पावलावर पाऊल टाकत 43 वर्षीय एकता सरोगसीद्वारे एका बाळाची आई बनली आहे. या बाळाचा जन्म 27 जानेवारी रोजी झाला असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"मला लग्न करायचं नाही," असं एकताने अनेकदा सांगितलं होतं. पण तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचा जन्म झाला होता, तेव्हा एकतानेही आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. जबाबदारी स्वीकारण्यायोग्य झाले तर मला आई बनायला आवडेल, असं एकता म्हणाली होती.
याआधी तुषार कपूरशिवाय करण जोहरही सरोगेसीद्वारे जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. शिवाय सनी लिओनी देखील सरोगसीनेच जुळ्या बाळांची आई बनली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement