Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडणार जेठालाल? दिलीप जोशी म्हणाले...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) हे साकारतात.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रसिद्ध मालिका गेली 13 वर्ष ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) साकारतात. मालिकेतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू होती की, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडणार आहेत. याबद्दल एका मुलाखतीमध्ये दिलीप यांना प्रश्न विचारण्यात आला. जाणून घेऊयात मालिका सोडण्याच्या निर्णयाबद्दल काय म्हणाले दिलीप जोशी...
मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांनी सांगितले, 'मी ही मालिका सोडत नाहिये. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना मी ही मालिका विनाकारण का सोडू? या शोमुळे मला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.'
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये काम मिळण्याआधी दिलीप यांच्याकडे कोणतेही काम नव्हते, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. ते म्हणाले होते की, 'माझ्याकडे काम नव्हते. मी ज्या शोमध्ये काम करत होतो तो बंद झाला. मी एका नाटकामध्ये पार्ट टाईम करण्यास सुरूवात केली. तो काळ माझ्यासाठी कठिण होता. पण नंतर मला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ही मालिका हिट झाली. '
दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया', 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी 'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टिव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.
हे ही वाचा
Dilip Joshi : दिलीप जोशींच्या मुलीचा थाटामाटात पार पडला लग्न सोहळा; सोशल मीडियवर फोटो व्हायरल
Dilip Joshi Net Worth : आलिशान घर ते लग्झरी गाड्या; अशी आहे तारक मेहतामधील जेठालालची लाईफस्टाईल