Dilip Joshi Net Worth : आलिशान घर ते लग्झरी गाड्या; अशी आहे तारक मेहतामधील जेठालालची लाईफस्टाईल
Dilip Joshi : जाणून घेऊयात दिलीप जोशी यांच्या संपत्तीबाबत...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहता मालिकेमधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) हे साकारतात. दिलीप यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. जाणून घेऊयात दिलीप जोशी यांच्या संपत्तीबाबत...
एका रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांच्याकडे Audi Q-7 ही लग्झरी गाडी आहे. तसेच त्यांचे मुंबईमध्ये आलिशन घर देखील आहे. रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांची एकूण संपत्ती 43 कोटी रूपये आहे. दिलीप हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या एका एपिसोडचे 1.5 लाख रुपये मानधन घेतात. काही दिवसांपूर्वी दिलीप जोशी यांनी ब्लॅक कलरची Kia Sonet ही सबकॉम्पॅक्ट SUV गाडी घेतली. या गाडीची किंमत 12.29 लाख रूपयांपासून सुरू होते. दिलीप यांनी दिवाळीला ही गाडी घेतली आहे.
View this post on Instagram
दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया', 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी 'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टिव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.
हे ही वाचा
- The Railway Men : भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित नवी वेब सीरिज; आर माधवनची प्रमुख भूमिका
- Swapnil Joshi Movie Bali : 'गूढ रहस्य उलगडायला येणार का ती..? ; बळीचा ट्रेलर रिलीज