Dhananjay Powar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : चौथा नंबर 'डीपी'चा, कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार बिग बॉसमधून बाद
Dhananjay Powar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमधून धनंजय पोवार आता एलिमिनेट झाला आहेत.
Dhananjay Powar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून धनंजय पोवारने (Dhananjay Powar) बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) एन्ट्री घेतली होती. धनंजयचा खेळ हा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आता धनंजयने बिग बॉसच्या घराबाहेर पडला असून अवघ्या काही पावलांवर त्याचं ट्रॉफीचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे.
धनंजय हा टॉप 6 मध्ये जाणारा तिसरा स्पर्धक होता. तसेच धनंजयच ही ट्रॉफी उचलणार अशी जोरदार चर्चाही सोशल मीडियावर होती. पण आता धनंजय ग्रँड फिनालेमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता तो ट्रॉफी उचलणार नसल्याचं स्पष्ट झालंय. विनोदी शैलीमुळे बिग बॉसच्या घरातलं धनंजय वातावरण अगदी हलकं केलं होतं. त्याचप्रमाण टास्कही तो तितक्याच जिद्दीने खेळला असल्याचंही पाहायला मिळालंय.
कोण आहे धनंजय पोवार?
सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजयला प्रसिद्धी मिळाली. बायको आणि आईसोबतचे त्याचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्याचमुळे धनंजयला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली. तसेच धनंजय एक व्यावसायिक देखील आहे. कोल्हापूरमध्ये धनंजयचा फर्निचरचा व्यवसाय आहे. सोसायटी फर्निचर या नावाने कोल्हापूर मध्ये भव्य असं फर्निचरचे शोरूम आहे. आपल्या विनोदी शैलीमुळे धनंजयला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्याचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला.
जान्हवी आणि अंकिता घराबाहेर
बिग बॉस मराठीच्या टॉप 6 स्पर्धकांपैकी दोन स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला आहे. सहाव्या स्थानावरुन जान्हवीने नऊ लाख रुपये घेत घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंकिता देखील बिग बॉसच्या घरातबाहेर पडली. आता टॉप 4 स्पर्धकांमधून धनंजयही घराबाहेर पडला आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन
28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले.
View this post on Instagram