Ankita Prabhu Walawalkar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : कोकण कन्येचा बिग बॉसचा खेळ संपला, ग्रँड फिनालेमध्ये येऊन अंकिता घराबाहेर
Ankita Prabhu Walawalkar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमधून अंकिता वालावलकर आता एलिमिनेट झाली आहेत.
Ankita Prabhu Walawalkar Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिच्या बिग बॉसमधील (Bigg Boss Marathi New Season) एन्ट्रीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. सुरुवातीला अंकिताला खेळाचा अंदाज आला नसल्याचंही पाहायला मिळालं. पण त्यानंतर जसा तिला खेळ समजला त्याप्रमाणे तिने बिग बॉसच्या घरातलं तिचं स्थान भक्कम केलं. पण आता ग्रँड फिनालेमध्ये येऊन ट्रॉफीपर्यंतचा अंकिताचा प्रवास आता संपला आहे.
अंकिता ही टॉप 6 मध्ये जाणारी शेवटची स्पर्धक होती. वर्षा उसगांवकर आणि अंकितामध्ये ग्रँड फिनालेची शर्यत रंगली होती. पण आता ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा हा प्रवास आता संपलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय. अंकिताने निखिल दामलेसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. त्यानंतर घरात तिने उचलेले मुद्दे, तिचा टास्क या सगळ्याविषयी भाऊच्या धक्क्यावरही वारंवार भाष्य करण्यात आलं.
कोकण हार्टेड गर्ल कशी झाली फेमस?
अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar) ही मूळची कोकणातली आहे. तिने युट्युबवर तिच्या 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने पेज सुरु केलं. सध्या तिच्या या युट्युबच्या पेजवर 268 लाख इतके सबस्क्राइबर्स आहेत. अंकिता तिच्या युट्युब चॅनलवर कोकणातले अनेक व्हिडीओ टाकत असते. त्यावरुन तिची कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख झाली. त्याचप्रमाणे अंकिताचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. बिग बॉसच्या घरातही अंकिताचा कोकणी अंदाज पाहायला मिळाला.
जान्हवी किल्लेकर घराबाहेर
दरम्यान टॉप 6 स्पर्धकांपैकी सुरुवातीला जान्हवी किल्लेकरने घराचा निरोप घेतला. जान्हवी नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली. त्यामुळे ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन जान्हवीचा खेळ संपला. त्यानंतर आता अंकितानेही घराचा निरोप घेतला असल्याचं पाहायला मिळतंय.
बिग बॉसचा खेळ 70 दिवसांतच संपला
दरम्यान बिग बॉस हा खेळ 100 दिवसांचा असतो. याआधीही बिग बॉस मराठीचे जे चार सीझन झाले, तो खेळही 100 दिवसांचाच होता. पण यंदा हा खेळ फक्त 70 दिवसच ठेवण्यात आला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात होत आहे. त्याचमुळे मराठीच्या सीझनने लवकर निरोप घेतला असल्याचं म्हटलं जातंय.
View this post on Instagram