![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devmanus 2 : 'देवमाणूस 2' ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, 'ती परत आलीये' मालिका घेणार निरोप
Devmanus 2 : सगळ्यांचा लाडका 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
![Devmanus 2 : 'देवमाणूस 2' ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, 'ती परत आलीये' मालिका घेणार निरोप Devmanus 2 Curiosity among viewers of Devmanus 2 Devmanus 2 : 'देवमाणूस 2' ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, 'ती परत आलीये' मालिका घेणार निरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/22/ae5cb54e0969d4e6662682d3499f3eb6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devmanus 2 : झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. 'देवमाणूस' ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ठरली होती. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.
मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार आहे, अशी चर्चा सुरु होती. प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. पण आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
View this post on Instagram
'देवमाणूस 2' लकरकच सुरू होणार आहे. मालिकेतील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यासोबत देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लूक या नवीन भागात कसा असणार आहे, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे. लवकरच 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात नव्या आठवड्यात रंगणार नवे टास्क
Jersey Poster : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)