kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण
kamal haasan Tests Covid 19 Positive : सुपरस्टार कलम हासनला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला (kamal haasan) कोरोनाची लागण झाली आहे. कमल हसन नुकतेच अमेरिका दौऱ्यावरून परतले होते. त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कमल हासनचे लसीकरणदेखील पूर्ण झाले होते.
कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेवरून परतत असताना त्यांना सौम्य खोकल्याचा त्रास जाणवला. त्यानंतर तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या ते रुग्णालयात क्वारंटाईन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नसून नागरिकांनी अधिक काळजी घ्यायला हवी,असेही ते पुढे म्हणाले.
அமெரிக்கப் பயணம் முடிந்து திரும்பிய பின் லேசான இருமல் இருந்தது. பரிசோதனை செய்ததில் கோவிட் தொற்று உறுதியானது. மருத்துவமனையில் தனிமைப்படுத்திக் கொண்டுள்ளேன். இன்னமும் நோய்ப்பரவல் நீங்கவில்லையென்பதை உணர்ந்து அனைவரும் பாதுகாப்பாக இருங்கள்.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) November 22, 2021
कमल हासन यांनी दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिवूडमध्येदेखील आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांनी 1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. कमल हासन एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले आहे.
तमिळनाडूमध्ये कमल हासन यांचा पराभव
अभिनेता-राजकारणी कमल हासन यांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी हासन यांना पराभूत केले होते. कोयंबतूर दक्षिण जागेवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. शेवटी भाजपने येथे आपला विजय नोंदविला. दरम्यान, तमिळनाडूमध्ये संत्तातर झाले असून आता डीएके युती सत्तेत आली आहे.
संबंधित बातम्या
तमिळनाडूमध्ये कमल हासन यांचा पराभव, कोयंबतूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयी
Madhavi Gogate Passes Away : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन
चार बडे सिनेमे एकमेकांना भिडणार; Prabhas, Aamir Khan आणि Varun Dhawan यांचे बिग बजेट सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha