Bigg Boss 18 : पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'ला मिळाले टॉप 2 फायनलिस्ट, सलमान खानची मोठी घोषणा
Bigg Boss 18 Season Top 2 Contestants Name : बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरू होण्यापूर्वीच निर्मात्यांना टॉप 2 फायनलिस्ट मिळाले आहेत. खुद्द सलमान खानने ही मोठी घोषणा केली आहे.
Bigg Boss New Season 18 : अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' आजपासून सुरू होत आहे. या शोचा भव्य प्रीमियर आज पार पडणार आहे. यंदाही बिग बॉस शोमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या खांद्यावर होस्टिंगची जबाबदारी आहे. बिग बॉस 18 शो ग्रँड प्रीमियरच्या आधी कलर्सच्या इन्स्टा हँडलवर एकामागून एक अनेक प्रोमो रिलीज करण्यात येत आहेत, ज्यामध्ये स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे. यासोबतच शोमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत.
पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'ला मिळाले टॉप 2 फायनलिस्ट
बिग बॉस 18 (Bigg Boss 18) सीझन खूप रोमांचक असणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची नावे हळूहळू उघड होत आहेत. आज, रविवारी या शोचा ग्रँड प्रीमियर आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे सदस्य म्हणून समोर आली आहेत. नवीन स्पर्धक आणि नवीन गेम प्लॅनसह नवीन थीम सुरू होत आहे. आता बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रीमियरच्या दिवशीच टॉप 2 फायनलिस्टची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सलमान खानकडून मोठी घोषणा
बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरू होण्यापूर्वीच निर्मात्यांना टॉप 2 फायनलिस्ट मिळाले आहेत. खुद्द शोचा होस्ट सलमान खानने शोच्या प्रोमोमध्ये याचा खुलासा केला आहे. यामुळेच शोबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. कलर्सने टॉप 2 फायनलिस्टचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये एक महिला आणि एक पुरुष सदस्य फायनलिस्ट असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
बिग बॉस 18 ला मनोरंजक बनवण्यासाठी निर्माते नवनवे ट्विस्ट आणताना दिसणार आहेत. याची सुरुवात ग्रँड प्रीमियरपासूनच होणार आहे. प्रोमोमध्ये शोच्या निर्मात्यांनी दाखवलं की, यावेळी घरातील सदस्यांचे भविष्य आरशात दिसेल. यंदा बिग बॉसच्या घरात एक कारागृह देखील आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :