Ankita Walawalkar Dating : ‘या’ लोकप्रिय कलाकाराला डेट करतेय 'बिग बॉस' फेम अंकिता, 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकण हार्टेड बॉय' कोण? जाणून घ्या
Ankita Walawalkar Marriage : बिग बॉस फेम कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर लवकरच लग्न करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
Ankita Walawalkar Dating Rumors : बिग बॉस मराठीच्या यंदाचा पाचवा सीझन धम्माल होता. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या रिल्स स्टार सूरज चव्हाणने ट्रॉफीवर नाव कोरलं. अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी टॉप 5 फायनलिस्ट होते. त्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच अंकिता वालावलकर हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अंकिता वालावलकरचा होणार नवरा कोण, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
लोकप्रिय कलाकाराला डेट करतेय 'बिग बॉस' फेम अंकिता
अलिकडेच सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार यांना भेटला. या भेटीचा व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सगळे एकमेकांना भेटनाता दिसत आहेत. यावेळी अंकिता सूरजला विचारते की, "सूरज तू दाजी बघितला ना? कसे वाटले तुला दाजी? कुणाला सांगू नको हा..." अशा संभाषणाचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. यामुळे अंकिताचा होणारा नवा नेमका कोण हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकण हार्टेड बॉय'
अंकिता वालावलकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताचा होणारा नवरा कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही महिन्यांपूर्वी अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर एका मुलासोबत फोटो शेअर केला होता. हाच तिचा होणार नवरा असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अंकिताने तरुण मुलासोबतचा फोटो शेअर करत ‘Trust Me, We Will Recreate This In Future’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
कोण आहे अंकिता वालावलकरचा होणारा नवरा?
मीडिया रिपोर्टनुसार, अंकिताने शेअर केलेल्या फोटोतील हा तरुण संगीत क्षेत्रातील आहे. अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव कुणाल भगत असल्याचं सांगितलं जात आहे. कुणाल संगीत दिग्दर्शक आहे. कुणालने अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांसह, गाणी आणि चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरची लगीनघाई
अंकिताचे चाहते कुणालला ‘कोकण हार्टेड बॉय’ (Kokan Hearted Boy) या नावाने हाक मारतात. अंकिताने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी या कोकण हार्टेड बॉयसाठी खास पोस्टही शेअर केली होती. सध्या अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु असल्याचं बोललं जात आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :