Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'नॉमिनेशनची तोफ' धडधडणार, निक्की-अंकितामध्ये होणार राडा
Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 4 : 'बिग बॉस मराठी' च्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) सुरुवातीपासून काही स्पर्धक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 'बिग बॉस'च्या घरात तिसऱ्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)यांच्यात खडाजंगी झाली होती. आता नॉमिनेशनच्या दरम्यान निक्की आणि 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) यांच्यात राडा झाला आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये दोघी एकमेकांना भिडल्या आहेत.
'बिग बॉस मराठी'मध्ये स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावे लागतात. प्रीमियरपासूनच 'बिग बॉस'ने स्पर्धकांना पेचात पाडले आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आजच्या दिवशी नॉमिनेशन कार्याची सुरुवात होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे. 'नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नॉमिनेशन टास्कमध्ये आता अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडण झाले आहे. टास्क दरम्यान निक्की अंकिताला धक्का देत असते. त्यावर अंकिता आक्षेप घेते. त्यानंतर निक्की अंकिताला धक्का देते. अंकिता चिडून मला धक्का देऊ नकोस असे सांगते आणि तिला ढकलते. त्यावर निक्की मला हात लावायचा नाही असे ओरडून अंकिताला सांगते.
View this post on Instagram
टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झाली आहे. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.