एक्स्प्लोर

27 वर्षांनी मोठ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली, वडिलांचा विरोध झुगारुन साताजन्माची गाठ बांधली, आज 'ही' अभिनेत्री 124 कोटींची मालकीण

Actress and CM Love Story : राधिका कुमारस्वामी म्हणजे, कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव. तसं पाहायला गेलं तर राधिका तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त माजी मुख्यमंत्र्यांसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे जास्त गाजली.

Radhika and Ex CM Kumaraswamy Uncommon Love Story : सध्याचे माजी मुख्यमंत्री आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबतच्या प्रेमप्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्रीनं संपूर्ण सिनेसृष्टी हादरवली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (Former Chief Minister of Karnataka HD Kumaraswamy) आणि अभिनेत्री राधिका यांचं प्रेमाचं सूत जुळलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण राज्यासह देशात एचडी कुमारस्वामी आणि राधिका दोघांच्याच चर्चा रंगल्या होत्या. पण, शेवटी म्हणतात ना, प्रेमापुढे काहीही नसतं... दोघेही एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की, दोघांनी कुणाचीच पर्वा न करता एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधण्याचं ठरवलं. 36 वर्षीय अभिनेत्रीनं स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाहित राजकारणी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्यावेळी दोघंचं लग्न झालं, त्यावेळी राधिका 27 वर्षांनी लहान होती. सध्या राधिका कोट्यवधींची मालकीण आहे. 

राधिका (Actress Radhika) कुमारस्वामी म्हणजे, कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव. तसं पाहायला गेलं तर राधिका तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त माजी मुख्यमंत्र्यांसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे जास्त गाजली. 2006 मध्ये राधिकानं कर्नाटकचे राजकारणी एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांच्याची लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कर्नाटकसह संपूर्ण देशभरात खळबळ माजली. 

मुख्यमंत्र्यांसोबत जुळलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं सूत... 

प्रसिद्ध अभिनेत्री आणि तेदेखील 27 वर्षांनी लहान, माजी मुख्यमंत्र्यांच्या लव्ह अफेअरमुळे कर्नाटकच्या राजकारणात वादळ आलं होतं. राधिकाचं संपूर्ण करिअर उध्वस्त झालं खरं, पण तिचं वैवाहिक जीवन आनंदानं भरलं. जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.डी.कुमारस्वामी यांच्या राजकारणापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात लोकांना जास्त रस वाटू लागला.

ज्यावेळी दोघांनी लग्नगाठ बांधली, त्यावेळी राधिका एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचं दुसरं लग्न होतं. एचडी कुमारस्वामी यांचं पहिलं लग्न अनिता यांच्यासोबत 1986 मध्ये झालं होतं. तर, राधिकाचं पहिलं लह्न 2000 मध्ये झालं होतं. पण, राधिकाचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि ती आपल्या पतीपासून विभक्त झाली. 

तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत अफेअर, वडिलांचा कडाडून विरोध 

एचडी कुमारस्वामी यांच्यासोबतच्या अफेअरबाबत राधिकाच्या वडिलांना कळालं, त्यावेळी वडिलांनी विरोध केला. पण, एचडी कुमारस्वामी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राधिकानं वडिलांचा विरोध झुगारुन एचडी कुमारस्वामी यांच्याशी गुपचूप लग्न केलं. राधिकानं उचललेल्या या पावलामुळे तिच्या वडिलांसोबतच कुटुंबाला मोठा धक्का बसला. पण त्यासोबतच कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली होती. 

साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेल्या राधिकानं जवळपास 30 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबतच्या लव्ह अफेअरनंतर तिचं करिअर उध्वस्त झालं. राधिकानं वयाच्या 14 व्या वर्षी 'नीनागी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली. त्यावेळी ती नववीत शिकत होती. 2002 मध्ये आलेल्या 'नीला मेघा शमा' या चित्रपटानं राधिकाला ओळख मिळवून दिली. 

आज राधिका चित्रपट निर्माती म्हणून प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांशी लग्न करून ती कोट्यवधींची मालकीण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांचे पती एचडी कुमारस्वामी यांची संपत्ती 44 कोटी रुपये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शंभरदा नाकारलं 'त्याला', पण अखेर स्विकारावं लागलंच; 2003 मध्ये पदार्पण, 2019 मध्ये दिला हीट चित्रपट, आजही बॉलिवूड गाजवतोय 'हा' स्टार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
Embed widget