(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : निक्की अन् अरबाजची केमिस्ट्री, अभिजीतची सुरेल बरसात; कल्ला टीव्हीवर जबरदस्त परफॉर्मन्सचा तडका
Bigg Boss Marathi New Season Day 12 : आज बिग बॉस मराठीच्या कल्ला TV वर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत. या कोणता कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss Marathi) आज मनोरंजनाचा तडका लागणार आहे. या घरात धुडगूस घालणारे सदस्य आज बिग बॉस टीव्हीवर कल्ला करताना दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरात नुकतच नॉमिनेशन कार्य पडलं आहे, त्याआधी या घराला पहिला कॅप्टनही मिळाला आहे. यानंतर आता बिग बॉसने घरातील सदस्यांसह बिग बॉस प्रेमींच्याही मनोरंजनाची लयभारी सोय केली आहे. आज बिग बॉसच्या घरातील स्पर्धक इंटरटेनमेंटची आतषबाजी करताना दिसतील.
कल्ला टीव्हीवर जबरदस्त परफॉर्मन्सचा तडका
बिग बॉस मराठीच्या घरात आज बाराव्या दिवशी बिग बॉस टीव्हीचा टास्क पार पडणार आहे. यामध्ये घरातील स्पर्धक एकापेक्षा एक परफॉरर्मन्स सादर करताना दिसतील. बिग बॉस मराठीचा आजचा दिवस 'बिग बॉस'प्रेमींसाठी खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. 'बिग बॉस'च्या कल्ला टीव्हीवर घरातील सदस्य धुडगूस घालणार आहेत. या कल्ला टीव्हीवर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत. घरातील सर्वच एकापेक्षा एक सदस्य आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. आता यामध्ये कोणता तुफानी कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार हे पाहावं लागेल.
निक्की-अरबाजची केमिस्ट्री
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाल्यापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची जोडी 'बिग बॉस'प्रेमींच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आज निक्की आणि अरबाजच्या अदांवर सगळे फिदा होणार आहेत. निक्की आणि अरबाज आज एकत्र परफॉर्म करताना दिसणार आहे. बिग बॉस प्रेमींना यांची केमिस्ट्री आवडत असल्याने त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
View this post on Instagram
अभिजीत सावंतची सुरेल बरसात
सूरांचा बादशाह अभिजीत सावंतने आपल्या आवाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये अभिजीत सावंतने एन्ट्री घेतली असून त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडत आहे. आज इंडियन आयडल विजेत्या सूरांच्या बादशाहची सुरेल बरसात बिग बॉस मराठीच्या घरात होणार आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :