Bigg Boss Marathi : "माझ्या तोंडाला लागू नको", DP दादा आणि आणि घनःश्याम यांच्यात वादाची ठिणगी; बिग बॉसच्या घरात नवा राडा
Bigg Boss Marathi Season 5 : आज बिग बॉसच्या घरात धनंजय पोवार आणि छोटा पुढारी यांच्यात वाद झालेला पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi Day 13 : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रेम आणि राडा पाहायला मिळत आहे. काही सदस्यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे, तर काही सदस्यांमधील राडा चर्चेचा विषय ठरत आहे. बिग बॉसच्या घरात कधी कोणत्या सदस्यांमध्ये वाद निर्माण होईल हे काही सांगता येणार नाही. आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरोडे आणि धनंजय पोवारमध्ये यांच्यात बाचाबाची पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरात नवा राडा
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये धनंजय पुढारीला विचारतोय, "पुढारी तुमच्याकडे किती कामं आहेत?". त्यावर पुढारी एक असं उत्तर देतो. त्यावर धनंजय म्हणतो, "तोंड शिवलं होतं का आता विचारताना". त्यानंतर छोटा पुढारी घन:श्यामला म्हणतो,"तोंड शिवलं का ही कोणती पद्धत आहे बोलायची". त्यावर धनंजय म्हणतो, "मला वाटेल ते मी बोलेल".
DP दादा आणि आणि घनःश्याम यांच्यात वादाची ठिणगी
बिग बॉसच्या आणखी एका प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी यांची मैत्री बहरताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर निक्की तांबोळी घनश्यामला गालावर किस करतानाही दिसत आहे. यानंतर घनश्याम मात्र लाजेने लाले-लाल झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात बाई-बाई करणाऱ्या निक्की ताईनेच घनश्यामला किस केल्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.
"माझ्या तोंडाला लागू नको"
View this post on Instagram
बिग बॉस मराठीचा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात आज बाराव्या दिवशी इंटरटेंमेंटचा तडका पाहायला मिळणार आहे. आज बीबी हाऊसमध्ये टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :