(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 5 : "त्याला गेम खेळता येत नाही", वैभवच्या निर्णयामुळे टीम A नाखुष; गुलीगत सूरजसह चार सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार
Bigg Boss Marathi Nominated Contestant : वैभवच्या निर्णयामुळे 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात टीम A च्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असल्याचं दिसून येत आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 18 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा राडा आणि कल्ला सुरुच आहे. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर गेले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेशनपासून सदस्यांची सुटका झाली. गेल्या आठवड्यात नॉमिनेशनपासून दिलासा मिळाला असला तरी या आठवड्यात मात्र नॉमिनेशन होणार आहे. सध्या घरातील चार सदस्य नॉमिनेशनमध्ये आहेत.
वैभवच्या निर्णयामुळे टीम A नाखुष
बिग बॉस मराठी आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच झालं आहे. घरातील सदस्य स्वत:ची प्रगती करत पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. सदस्य यासाठी घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करतात. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तिसऱ्या आठड्यात कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे हे पाहावे लागेल.
View this post on Instagram
निक्की म्हणतेय, "वैभवला गेम खेळता येत नाही"
'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला सेव्ह केलं. अभिजीतने पॅडीला सेव्ह केलं. या नॉमिनेशन कार्यात टीम A विजयी झाली. कालच्या भागात वैभवने घन:श्यामला सेफ करुन अभिजीतला नॉमिनेट केल्याचं निक्की, अरबाज आणि जान्हवीला पटलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की वैभवला म्हणत आहे, "तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. तू आर्यासोबत भांडतोस. तुला तिला नॉमिनेट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती". पुढे निक्की वैभवला म्हणते, "वैभवला नाही जमत गेम खेळायला".
View this post on Instagram
'या' आठवड्यात 'हे' सदस्य झालेत नॉमिनेट
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल
महत्त्वाच्या इतर बातम्या :